Current
दृष्टीक्षेप: 

सर्व्हे क्र. ४७९ चाळीसगाव रोड, धुळे येथे ७९/८१ अल्प उत्पन्न गट घरकुलांची योजना.

सदर जागा ही म्हाडा अधिनियममधील कलम याअन्यवे सन १९८९-९० मध्ये अधिग्रहीत करण्यात आले. जमिनीची किंमत रू. १.२८ लक्ष प्रति हेक्टरप्रमाणे अदा करण्यात आले व ती व्याजासहीत योजनेवर गृहीत ठरण्यात आले.
१६१ सदनिका अल्प उत्पन्न गटाला म्हाडाने सन १९९२ - ९३ मध्ये दिनांक २०/७/१९९२ रोजी रू. ५६, ६८,४५०/- करीता प्रशासकीय मान्यता दिली आहे.परंतु अत्यल्प प्रतिसादामुळे केवळ ८० सदनिका बांधण्यात आल्या. आता १२ वर्ष झालेली आहे व त्यामुळे प्रशासकीय मान्यता अस्तित्वात नाही.
उर्वरीत योजना ७९/८१ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी राष्ट्रीय गृहनिर्माण कार्यक्रमातंर्गत प्रस्तावित आहे. सदर योजना ही हायर परचेस स्कीम अन्यवे कार्यन्वित करण्याचे प्रस्तावित आहे. सदनिकेची किंमत रू. २,१४,००० असून त्यामध्ये कर्ज रू. १,००,०००/- व उर्वरीत रक्कम लाभार्थ्यांकडून अर्जाच्या स्विकृतीच्या वेळी व बांधकाम काळादरम्यान प्रत्यक्ष ताबा देण्यापूर्वी वसूल करावयाची आहे.

स्थळदर्शक नकाशा: 
आराखडा: 
मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव : अल्प उत्पन्न गटाच्या २५ सदनिकेचे बांधकाम

ठिकाण : चाळीसगाव रोड, धुळे येथील सर्व्हे क्र. ४७९/२

योजनेचा प्रकार: अल्प उत्पन्न गट

एकुण भुखंड: २५ सदनिका

प्रति सदनिका क्षेत्रफळ: १६.८१ चौ.मी (भुखंडाचे क्षेत्रफळ ५०.०० चौ.मी.)

बांधकामाचे वर्ष: २००८-२००९

योजनेचा तपशिल: 

काम प्रगतीपथावर आहे.

View Other Projects