योजनेचे नाव : स.नं. ५६/२/१ चेहडी, नाशिक येथील सामुहीक घरांच्या योजनेचे बांधकाम .
सदर जमीन ही सी.बी.एस. नाशिक येथून १२ कि.मी. व रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथून ४ कि.मी. अंतरावर चेहडी शिवारात येते. जिल्हाधिकारी, नाशिक यांनी ०.६७ हेक्टर क्षेत्रफळ असलेली स.नं. ५६/२/१ चेह्डी ,नाशिक येथील शासकीय जमीन म्हाडाच्या गृहनिर्माण योजनांसाठी वाटप केलेली आहे.पाणीपुरवठयासाठी म्युन्सीपलच्या पाण्याच्या टाकीतून आलेली जलवाहीनी ही जवळच्या १५ मी. रस्त्याला लागून येते.म्युन्सीपलची झिवर वाहीनी जवळच्या १५ मी. डी.पी रोडलगत उपलब्ध आहे.
सदर जमीन ही रहिवासी क्षेत्रात असून बाह्य विद्युत पुरवठा सुध्दा जवळ उपलब्ध आहे.



योजनेचे नाव : मध्यम उत्पन्न गटाच्या 17 सदनिकांचे बांधकाम .मध्यम उत्पन्न गटाच्या 17 सदनिकांचे बांधकाम .
ठिकाण : स.नं. ५६ चेहडी,नाशिक
योजनेचा प्रकार: मध्यम उत्पन्न गट
एकूण गाळे: 17 गाळे
प्रति सदनिका क्षेत्रफळ: ३१.०९ चौ.मी.(भूखडांचे क्षेत्रफ्ळ ४६ चौ.मी.)
Year of Construction: 2008-2009
सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- हि योजना मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी असून त्यात आरसीसी फ्रेमचे स्ट्रक्चर हे सी.सी.टी डब्ल्यु पँनल दरवाजा असलेल्या मुख्य दरवाजा सुविधेसह आहे.
- बाकी खोल्यांसाठी साँलीड कोर फ्लश दरवाजा
- शौचालय / न्हाणीघरासाठी सिंटेक्स दरवाजा
- सर्व खोल्यांसाठी स्टील खिडक्या
- बाहेरील बाजूस सँड फेसड गिलावा
- आतील बाजूस १२ मि.मी.गिलावा नेरूफिनीश बरोबर
- बैठक खोलीस कोटा फ्लोरींग, स्वयंपाकघर व शयन खोली साठी मार्बल मोझँक टाईल्स आणि शौचालयामध्ये व्हाईट ग्लेजड टाईल्स
- न्हाणीघरासाठी ९० सेमी उंची असलेले रंगीत ग्लेजड टाईल्सचे डँडो आणि शौचालयासाठी ४५ सेमी उंचीचे पांढर्या रंगाचे ग्लेजड टाईल्सचे डँडो
- बाहेरून जलरोधक सिमेंट रंगकाम
- आतून वाँशेबल आँईल बाऊंड डिस्टेंपर रंगकाम
- स्वयंपाकघरासाठी कडप्पा ओटा व स्टेनस्लेस सिंक इ. सुविधा
काम प्रगतीपथावर आहे.