संरचना
वित्त शाखेचे कामकाज वित्त नियंत्रकांच्या अधिपत्याखाली चालते. वित्त नियंत्रकांची नेमणूक महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातून प्रतिनियुक्ती द्वारे करण्यात येते आणि लेखाधिकारी व सहाय्यक लेखा अधिकारी हे कामकाजात सहाय्य करतात.
कार्ये
- लेखा शाखेचे नियंत्रण करणे, सुसूत्रता राखणे.
- वित्तीय अर्थसंकल्प व प्राधिकरणाच्या निधीचा विनियोग या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे.
- वित्तीय बाबींवर सल्ला देणे.
- वार्षिक लेखे तयार करून घेणे व लेखा आक्षेपांचे निराकरण करणे.
- म्हाडा अंतर्गत कार्यालयाचे लेखापरीक्षण करणे.
- माननीय उपाध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी / प्राधिकरण यांचेकडून प्राप्त झालेले विषय.