उपमुख्य अभियंता (प्रकल्प, नियोजन व संकल्पना) या परिमंडळाच्या अधिपत्त्याखाली येत असलेली महत्त्वाची कामे.
- मुंबई मंडळातील विविध गृहनिर्माण योजनांचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव आर्थिक वर्धनक्षमता तपासून शिफारशीसह मुख्य अभियंता - II / प्राधिकरण व माननीय उपाध्यक्ष / प्राधिकरण यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करणे.
- मुंबई मंडळातील विविध योजनांच्या तांत्रिक मंजूरीसाठी प्राप्त झालेली अंदाजपत्रके तांत्रिकदृष्टया तपासून सदर अंदाजप्रत्रके शिफारशीसह मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करणे.
- गृहनिर्माण योजनांचे प्रारूप निविदांचे प्रस्ताव, त्यातील तरतूदी व अभिप्रेत अर्थ तपासून मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करणे.
- विविध गृहनिर्माण योजनाकरीता अर्हता प्राप्त ठेकेदारांची नियुक्ती करण्याबाबत मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांनी प्रनिस विभागास निर्दिष्ट केलेल्या प्रस्तावांचा परिनिरीक्षण/छाननी अहवाल शिफारशीसह मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांना सादर करणे.
- मुंबई मंडळातील गृहनिर्माण योजनांचा बांधकाम कार्यक्रम, सुधारीत बांधकाम कार्यक्रम, अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मुख्य अधिकारी / मुंबई मंडळ व मुख्य अभियंता / प्राधिकरण यांना सादर करणे.
- विधिमंडळ अधिवेशन काळात प्राप्त होणार्या विधान सभा / विधान परिषद प्रश्नांची उत्तरे शासनास पाठवण्यासबंधात समन्वय साधणे व पर्यवेक्षण करणे.
- मुंबई मंडळाअंतर्गत विविध योजनांचा मासिक प्रगती अहवाल मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविणे.
- मुंबई मंडळाअंतर्गत विविध योजनांचा २० कलमी कार्यक्रम अहवाल पाठविणे.
- मुख्य अधिकार्यांच्या / विभाग प्रमुखांच्या बैठकीसाठी गृहनिर्माण योजना बाबतची तांत्रिक माहिती मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांना सादर करणे.
- विविध गृहनिर्माण योजनांकरीता तांत्रिक बाबीविषयी मुख्य अभियंता -II / प्राधिकरण यांना सहाय्य करणे.
- बंद झालेल्या गिरण्यांच्या जमिनीवर सुधारीत विकास नियंत्रण नियमावली कलम ५८ अंतर्गत म्हाडास प्राप्त झालेल्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरे व संक्रमण शिबीर यांच्या विकासाची कामे करणे.
- ब्रुहनमुंबइ महानगरपालिका हद्दीतील बन्द/आजारी गिरिणितील कामगारांची माहिती संकलमन मोहिम .
- सारस्वत बँकेकडे अर्ज केलेल्या मिल कामगारांची यादी.
- माहितीच्या व्यवस्थापनाची पध्दत (प्रकल्प व नियोजन)
- ऐक्सिस बँकेकडे अर्ज केलेल्या मिल कामगारांची आणि मृत मिल कामगारांच्या वारसांची यादी.
- गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीचा निकाल-यशस्वी / प्रतिक्षा यादी.
उपमुख्य अभियंता (स्थापत्य) या परिमंडळाच्या अधिपत्त्याखाली येत असलेली महत्त्वाची कामे.
- प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव माननीय मुख्य अभियंता - II /प्राधिकरण यांच्यामार्फत माननीय उपाध्यक्ष प्राधिकरण यांना सादर करणे.
- अंदाज पत्रकाची तांत्रिकदृष्टया तपासणी करून सदर प्रस्ताव तांत्रिक मंजूरीकरीता माननीय मुख्य अभियंता - II/प्राधिकरण यांना सादर करणे.
- प्रारूप निवीदा प्रस्तावाची तांत्रिकदृष्टया तपासणी करून सदर प्रस्ताव मंजूरीकरीता माननीय मुख्य अभियंता / प्राधिकरण यांना सादर करणे.
- निविदा स्विकृती प्रस्तावाची तपासणी करणे.
- बांधकाम कार्यक्रम, सुधारीत बांधकाम, कार्यक्रम अंदाजपत्रक, सुधारीत अंदाजपत्रक याबाबतची सर्व माहिती जमा करून नोंद करणे.
- मुंबई मंडळाच्या अधिपत्त्याखाली तसेच सबंधित परिमंडळाशी विधान परिषद / विधान सभा प्रश्नांची उत्तरे शासनास त्वरीत सादर करण्याबाबत सहनियंत्रण करणे.
- मासिक प्रगती अहवाल माननीय उपाध्यक्ष प्राधिकरण यांना माननीय मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांच्यामार्फत नियोजीत वेळेस सादर करणे.
- २० कलमी कार्यक्रम तसेच बी.एस.यु.पी / प्रकल्पाचा प्रशासकीय अहवाल / प्रगती अहवाल नियोजीत वेळात सादर करणे.
- विभाग प्रमुख तसेच परिषदेसाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती / अहवाल तयार करून माननीय मुख्य अधिकारी / मुंबई मंडळ यांना सादर करणे.
- माननीय मुख्य अभियंता /प्राधिकरण यांचेकडून घरबांधणी प्रकल्पाबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करणे.
उपमुख्य अभियंता (एस.आर.डी.)यांची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे :
- मुं.इ.दु.वपु. मंडळाने हस्तांतरीत केलेल्या मोकळ्या जमिनीवर संयुक्त गृहनिर्माण योजना राबवणे.
- सक्षम प्राधिकार्याकडून योजनांना प्रशासकीय मान्यता घेणे.
- गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने पूर्वरचित साहित्य वापरुन बांधकाम करणार्या अभिकर्त्याची नोंदणी प्रक्रिया करणे.
- म्हाडाचे ठरावानुसार कंत्राटदांरास स्विकृतीपत्र देणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नकाशांना मंजूरी मिळविणे व सक्षम प्राधिकार्याकडून आवश्यक परवानगी मिळविणे.
- सक्षम प्राधिकार्याची तांत्रिक मंजूरी घेणे.
- सक्षम प्राधिकार्याची मसुदा निविदा पत्रास मंजूरी घेणे.
- करारनामा झाल्यानंतर कंत्राटदारास कार्यादेश देणे.
- योजना सुरू करण्यासाठी मोकळी जमीन उपलब्ध करण्यासंबधी मुं.इ.दु. व पु. मंडळाशी पत्रव्यवहार करणे.
- बांधकाम पायाच्या स्थरासंबधी अभिलेख जसे नमुना परीक्षणासाठी खड्डा भोक पाडणे. व बांधकाम साहित्याचे चाचणी अहवाल.
- प्रगतीपथावरील योजनांच्या कामांवर देखरेख ठेवणे.
- कंत्राटदारास देण्यात आलेल्या (बांधकामाच्या तयारीकरिता अग्रिम), कंत्राटदारास अदा करण्यात आलेली चालू देयके आणि संबंधित रजिस्टर्स, अभिलेख ठेवणे.
- स्थानिक संस्थांशी जसे बृ.मुं.न.पा.,बेस्ट रिलायन्स एनर्जी इत्यादी स्थानिक संस्थांशी पाणी पुरवठा ,मल:निसारण जोडणी व विद्युत पुरवठा मिळणेबाबत पत्रव्यवहार करणे.
- भोगवटा प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी बृ.मुं.न.पा.चा इमारत प्रस्ताव विभागाशी पत्रव्यवहार करणे.
- योजनेतील रस्ते, पाणीपुरवठा, बाहय मल:निसारण आणि मोकळे भूखंड इत्यादी हस्तांतरण करण्यासाठी स्थानिक संस्थाशी (संबधित बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये) पत्रव्यवहार करणे.
- योजनेमध्ये बदल असल्यास सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करणे.
- मुं.इ.दु व पु.मंडळ यांना हस्तांतरीत केलेल्या संक्रमण सदनिकांच्या इमारतीबाबत अभिलेख ठेवणे.
- तात्पुरती विक्री किंमत/ अंतिम विक्री किंमती बाबत प्रस्ताव तयार करणे व सक्षम प्राधिकार्याची मंजूरी घेणे.
- सक्षम प्राधिकार्याची सेवा आकारास मंजूरी घेणे.
- विविध योजनेतील सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीरात प्रसिध्द करण्यासाठी संचालक /पणन यांना माहिती पुरविणे.
- यशस्वी लाभार्थ्याना हस्तांतरीत करण्यात आलेल्या सदनिकांची माहिती ठेवणे.
- सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी व इमारतीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी मिळकत व्यवस्थापक कार्यालयाशी पत्रव्यवहार करणे.