प्रादेशिक मंडळे ही प्राधिकरणाची स्वतंत्र कार्यवाहू आहे. प्राधिकरणॅ ही एक स्थायी स्वरूपाची व स्वतंत्र मुद्रा असणारी संविधिक संस्था असल्यामुळे तिच्या अधिपत्याखाली काम करणा-या प्रादेशिक मंडळाच्या ध्येय धोरणाच्या चौकटीत राहून तसेच प्रधिकतरणाने वेळोवेळी विहित करत असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करवे लागते.
१. भूसंपादन
मंडळामार्फत गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी ठाणॆ,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालील विविध स्त्रोतांद्वारे भूसंपादन केले जाते.
- ना.ज.क.धा. जमीन
- शासकीय जमीन
- निमशासकीय जमीन
- म्हाड कायदा कलम ५२ अन्वये खाजगी जमीन
- म्हाड कायदा कलम ४१ अन्वये भूसंपादन
२. गृहनिर्माण
मंडळातर्फे विविध उत्पन्न गटातील लोकांकरिता जसे की अत्यल्प उत्पन्न गट , अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गटांतर्गत विविध वसाहतींमध्ये सदनिका बांधल्या जातात व भूखंड विकसित केले जातात. तसेच अन्य सुविधा जसे की, दुकाने ,दुकानी गाळॆ, व्यापारी भूखंड,सुविधा भूखंड, शाळा भूखंड इ. विकसित केले जातात.
३. केंद्र शासन पुरस्क्रुत व राज्य शासन पुरस्क्रुत योजनांचे सनियंत्रण
- लोक आवास योजना
- वाल्मिकी आंबेडकर आवास योजना
- जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण मिशन
- बीएसयुपी
- आयएचएसडीपी
- राष्ट्रीय झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम
- राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. १ (मूळ व सुधारित)
- राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. २ (मूळ व सुधारित)