परतावा अथवा विनापरतावा दुरुस्ती ना हरकत प्रमाणपत्रासाठी कार्यप्रणाली :-
मुंबई बेटावरील दुरुस्ती उपकरप्राप्त इमारतींच्या परतावा अथवा विनापरतावा दुरुस्ती ना हरकत प्रमाणपत्रासाठी पुढील प्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्यात येते.
- प्रस्ताव दोन प्रतींमध्ये सादर करण्यात यावा.
- प्रस्ताव दाखल करताना खालील माहिती देण्यात यावी :
- इमारतीचे नाव
- उपकर क्रमांक
- इमारतीचा वर्ग
- बांधकामाचा प्रकार.
- मालकाचे नाव
- मजल्यांची संख्या.
- बांधकाम क्षेत्र.
- रहिवाशी अथवा भाडेकरुंची संख्या. (निवासी + अनिवासी = एकुण)
- इमारतीस दुरुस्तीची आवश्यकता आहे ?
- असल्यास पुढील माहिती द्यावी :
- टप्पा क्रमांक १/२/३/४
- प्रशासकीय मान्यतेची किंमत
- प्रशासकीय मान्यतेची तारीख
- मागील टप्प्या पर्यंतचा दुरुस्तीचा खर्च रु.
- झालेल्या खर्चा प्रमाणे दर प्रती चौरस मिटर.
- अनुज्ञेय खर्चाची मर्यादा.
- उपलब्ध निधी.
- प्रस्तावाची थोडक्यात माहिती.
- किमान ७०% अधिकृत रहिवाशी किंवा भोगवटादारांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे का.... होय / नाही.
- ज्या भाडेकरू / भोगवटादार यांनी ना हरकत प्रमाणपत्रधारकाची नेमणूक केली आहे, ते अधिकृत भाडेकरू / भोगवटादार / मालक आहेत का?
- प्रस्तावित दुरुस्ती.
- उप अभियंता यांचे अभिप्राय.
- कार्यकारी अभियंता यांचे अभिप्राय.
- प्रस्ताव सादर करताना खालील कागदपत्रांच्या प्रमाणित छायांकित प्रती सादर करण्यात याव्यात. सदर प्रती राजपत्रीत अधिकारी / एस.ई.एम. किंवा अन्य अधिकृत व्यक्ती कडून प्रमाणित केलेल्या असाव्यात. सदर प्रती वास्तूशास्त्रज्ञाने प्रमाणित करु नयेत.
- भाडेकरुंचा अर्ज / ना हरकत प्रमाणपत्रधारकाचा अर्ज.
- वास्तूशास्त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाच्या नेमणूकीचे पत्र.
- वास्तूशास्त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाचे स्वीकृतीचे पत्र.
- खाली दिलेल्या तक्त्यामध्ये भाडेकरू / भोगवटादार यांची प्रमाणित यादी.
अ.क्र. | घर / दुकान क्र. निवासी/अनिवासी | मजला | भाडेकरूचे / भोगवटादाराचे नाव | वापर | क्षेत्रफळ |
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
भाडेकरू / भोगवटादारांची यादी संबंधीत उप अभियंता यांनी तपासावी, तसेच सदर यादी कार्यकारी अभियंता यांनी प्रमाणित करावी. उपअभियंता यांनी पुढील प्रमाणे प्रमाणित करावी.
भाडेकरू / भोगवटादारांची यादी मी तपासली आहे, व ती बरोबर आढळून आली.
वरील प्रमाणिकरण व खालील कागदपत्रांअभावी प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.
- भाडेकरू / भोगवटादार यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य असल्याबाबतचे रु.१०० च्या मुद्रांक शुल्क पत्रावर सामंजस्य करारपत्र.
- भाडेकरू / भोगवटादार ना हरकत प्रमाणपत्रासाठी मंडळाच्या शर्ति व अटी मंजूर असल्याबाबत रु.१००/- च्या मुद्रांक शुल्क पत्रावर हमीपत्र.
- मंजूर नकाशाप्रमाणे दुरुस्तीचे काम करण्यात येईल, तसेच दुरुस्तीचे काम करत असताना कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केले जाणार नाही, अश्या आशयाचे हमी पत्र रु.१०० च्या मुद्रांक शुल्क पत्रावर नाहरकत प्रमाणपत्रधारक / वास्तूशास्त्रज्ञ यांनी सादर करावे. दुरुस्तीचे काम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास नाहरकत प्रमाणपत्रधारक / वास्तूशास्त्रज्ञ यांना व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल. अश्या परिस्थितीमध्ये वास्तुशास्त्रज्ञ आणि ठेकेदाराचे मंडळाकडे असणारे नोंदणीप्रमाणपत्र रद्द करण्यात येईल.
- प्रस्तावित दुरुस्ती दर्शविणारा नकाशा..
- अद्ययावत दुरुस्ती उपकर भरल्याचे दर्शविणारे दुरुस्ती उपकर देयक.