Image

अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती हे म्हाडाचा एक प्रादेशिक घटक असुन या विभागीय मंडळाची स्थापना २२ जुलै,१९९२ ला शासन निर्णय क्रमांक २६७९/बी अन्वये महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये करण्यात आली. अमरावती मंडळाचे अधिनस्त असलेल्या मंडळाचे कार्यक्षेत्र हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या ५ जिल्हयांसाठी आहे. सदर जिल्हे यापूर्वी नागपुर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, याचे अधिनस्त होते, नागपुर मंडळाचे विभाजन करुन अमरावती मंडळाची निर्मीती करण्यात आली. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिनस्त असलेल्या अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्यालय हे अमरावती येथे असुन सदरहू मंडळावर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबई,येथून नियंत्रण व देखरेख करण्यात येते. अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,अमरावती या कार्यालयाचे मुख्यालय,अमरावती येथे गृहनिर्माण भवन,टोपे नगर,मालटेकडी रोड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) समाजातील विविध उत्पन्न गटातील लोकांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण योजना आणि भूखंड विकास योजना राबवते.

अमरावती गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ प्रामुख्याने खालील क्षेत्रांमध्ये काम करते.

  • १. गृहनिर्माण योजना
  • २.जमीन संपादन
  • 3.प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय)

अमरावती गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने खालील कार्यक्रम राबविले आहेत

  • १.झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम
  • 2.राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना
  • 3.वाल्मिकी आंबेडकर आवास योजना (वांबे)