महाराष्टृ गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही एक शिखर संस्था असून प्राधिकरणाच्या अखत्यारीतील काम करणार्‍या मंडळापैकी नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे एक विभागीय मंडळ आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना दिनांक २३/८/१९९२ रोजी म्हाड कायदा १९७६ च्या कलम १८ अन्वये झाली आहे. नाशिक मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक येथे असून त्याअंतर्गत नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्हयांचा समावेश आहे.हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबईच्या अधिपत्य व नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

विभागीय कार्यालयाचा पत्ता :-
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
गृहनिर्माण भवन, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक - ४२२००२
दूरध्वनी क्र. ०२५३-२५७३०४९, २३१०३६५ फँक्स क्र. ०२५३-२३१७६३३