Mumbai Board History - Mr

बाँम्बे गृहनिर्माण मंडळाची स्थापना १९४८ साली झाली आणि त्यांचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्रात विदर्भाशिवाय होते. विदर्भ गृहनिर्माण मंडळाची स्थापना सन १९५१ साली झाली. व त्यांची कार्यक्षेत्र विदर्भ प्रदेशात मध्य प्रदेश राज्यात होती.

ही दोन्ही मंडळे निवासी इमारतींचे विविध योजनाअंतर्गत बांधकामाचे काम संस्थाच्या विविध घटकांसाठी करीत.या इमारतींचे वितरणाचे आणि देखभालीचे काम सुध्दा यांच्याकडून पाहिले जात होते. सन १९६० साली राज्याच्या पुनर्बांधणीनंतर विदर्भ गृहनिर्माण मंडळ बाँम्बे गृहनिर्माण मंडळात समाविष्ट केले. या मंडळास नंतर महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ असे संबोधिले जाते. बाँम्बे इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ याची स्थापना बाँम्बे बिंल्डीग रिपेअर बोर्ड कायदा १९६९ अंतर्गत करण्यात आली. महाराष्ट्र झोपडपटटी सुधार मंडळाची स्थापना मुंबई झोपडपटटी सुधार मंडळ कायदा १९७३ अंतर्गत करण्यात आली.

म्हाडाची स्थापना १९७७ च्या कायदा अन्यवे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ आणि मुंबई झोपडपटटी सुधार मंडळे यांच्या एकत्रिकरण करून म्हाडा कायद्याअंतर्गत मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ आणि मुंबई गृहनिर्माण मंडळ एकत्रित करून बाँम्बे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना केली. १९९२ साली पुन्हा बाँम्बे इमारत व दुरूस्ती पुनर्रचना मंडळाची स्वंतत्ररीत्या बाँम्बे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातून वेगळे करून करण्यात आली. नंतर बाँम्बे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळास नवीन नाव मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ देण्यात आले (म्हाडा).