विदर्भ गृहनिर्माण मंडळ सन १९५१ पासून स्वतंत्ररित्या विदर्भात कार्यरत होते. त्यानंतर नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा प्रादेशिक घटक म्हणून विदर्भाच्या ९ जिल्हयात ५ डिसेंबर, १९७७ पासून कार्यरत होते. दि. १३/७/१९९२ रोजी अमरावती मंडळाची स्थापना झाली असून,नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या सहा जिल्हयात कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त राहून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण समाजाच्या विविध गटातील लोकांना घरे व विकसित भूखंड मालकी हक्काने उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेते व त्यानुसार घरबांधणी व जमिन विकासाचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविते.