कार्य आणि जबाबदारी
  • प्राधिकरणातील तांत्रिक बाबीमध्ये सहयोग, पर्यवेक्षण व नियंत्रण तसेच संबधित जमिनीची प्रकरणे.
  • जेएनएनयुरआरएम पीएमएवाय संबंधित सर्व कामे.
  • शासन व म्हाडामधील वरिष्ठांना तांत्रिक बाबीमध्ये सल्ला देणे.
  • आवश्यकतेप्रमाणे शासन, म्हाडा व मंडळ यांच्या विविध बैठकीस हजर राहणे.
  • त्यांच्या अखत्यारितील विविध मंडळांच्या संबधात पर्यवेक्षण व तक्रांरीची शहानिशा करणे.
  • उपाध्यक्ष तथा मुख्य अधिकारी/ प्राधिकरण त्यांनी दिलेली कोणतेही इतर विषयांकीत कामे.
  • बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासाशी संबंधित कामे.
कार्य आणि जबाबदारी
  • प्राधिकरणातील तांत्रिक बाबीमध्ये सहयोग, पर्यवेक्षण व नियंत्रण तसेच संबंधित जमिनीची प्रकरणे.
  • शासन व म्हाडामधील वरिष्ठांना तांत्रिक बाबीमध्ये सल्ला देणे.
  • आवश्यकतेप्रमाणे शासन, म्हाडा व मंडळ यांच्या विविध बैठकीस हजर राहणे.
  • त्यांच्या अखत्यारितील विविध मंडळांच्या संबधात पर्यवेक्षण व तक्रांरीची शहानिशा करणे.
  • उपाध्यक्ष तथा मुख्य अधिकारी/ प्राधिकरण त्यांनी दिलेली कोणतेही इतर विषयांकीत कामे.
  • सक्षम प्राधिकार्‍याची मसुदा निविदा पत्रास मंजूरी घेणे.
  • करारनामा झाल्यानंतर कंत्राटदारास कार्यादेश देणे.
  • योजना सुरू करण्यासाठी मोकळी जमीन उपलब्ध करण्यासंबधी मुं.इ.दु. व पु. मंडळाशी पत्रव्यवहार करणे.
  • बांधकाम पायाच्या स्थरासंबधी अभिलेख जसे नमुना परीक्षणासाठी खड्डा भोक पाडणे. व बांधकाम साहित्याचे चाचणी अहवाल.
  • प्रगतीपथावरील योजनांच्या कामांवर देखरेख ठेवणे.
  • कंत्राटदारास देण्यात आलेल्या (बांधकामाच्या तयारीकरिता अग्रिम), कंत्राटदारास अदा करण्यात आलेली चालू देयके आणि संबंधित रजिस्टर्स, अभिलेख ठेवणे.
  • स्थानिक संस्थांशी जसे बृ.मुं.न.पा.,बेस्ट रिलायन्स एनर्जी इत्यादी स्थानिक संस्थांशी पाणी पुरवठा ,मल:निसारण जोडणी व विद्युत पुरवठा मिळणेबाबत पत्रव्यवहार करणे.
  • भोगवटा प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी बृ.मुं.न.पा.चा इमारत प्रस्ताव विभागाशी पत्रव्यवहार करणे.
  • योजनेतील रस्ते, पाणीपुरवठा, बाहय मल:निसारण आणि मोकळे भूखंड इत्यादी हस्तांतरण करण्यासाठी स्थानिक संस्थाशी (संबधित बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये) पत्रव्यवहार करणे.
  • योजनेमध्ये बदल असल्यास सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करणे.
  • मुं.इ.दु व पु.मंडळ यांना हस्तांतरीत केलेल्या संक्रमण सदनिकांच्या इमारतीबाबत अभिलेख ठेवणे.
  • तात्पुरती विक्री किंमत/ अंतिम विक्री किंमती बाबत प्रस्ताव तयार करणे व सक्षम प्राधिकार्‍याची मंजूरी घेणे.
  • सक्षम प्राधिकार्‍याची सेवा आकारास मंजूरी घेणे.
  • विविध योजनेतील सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीरात प्रसिध्द करण्यासाठी संचालक /पणन यांना माहिती पुरविणे.
  • यशस्वी लाभार्थ्याना हस्तांतरीत करण्यात आलेल्या सदनिकांची माहिती ठेवणे.
  • सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी व इमारतीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी मिळकत व्यवस्थापक कार्यालयाशी पत्रव्यवहार करणे.

संरचना

प्राधिकरणातील वास्तुशास्त्रीय विभाग हा मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार यांच्या अधिपत्याखाली असून वास्तुशास्त्रीय कामकाजातील समन्वय,पर्यवेक्षण व नियंत्रणाची जबाबदारी सांभाळण्यात येते. विभागीय मंडळातील वास्तुशास्त्रीय कामकाज, वास्तुशास्त्रज्ञ यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्ररित्या सांभाळण्यात येते.

कार्य आणि कर्तव्य
  • विकास नियंत्रण नियमावलीचे वेळोवेळी अभ्यास करून शासनाकडे कालानुरूप बदल करण्याबाबत प्रस्ताव सादर करणे.
  • झोपडपट्टी पुनर्विकास, पुनर्बाधणी, नागरी नुतनीकरण योजना, संक्रमण शिबिरांचे पुनर्विकास, वसाह्तींचे पुनर्विकास, नवीन गृहनिर्माण योजना इ. अभ्यास करून त्यावर योजना तयार करण्याची कार्यवाही करणे.
  • मंडळाच्या वास्तुशास्त्रज्ञांच्या पँनेलवर वास्तुशास्त्रज्ञ / समंत्रक यांची नेमणूकीकरीता कार्यवाही करणे व आवश्यकतेनुसार विविध वसाह्तींचे भू-अभिन्यास मंजूरी करीता अथवा प्रकल्पांचे नियोजन करणे करीता नेमणूक करणे.
  • समंत्रक/वास्तुशास्त्रज्ञांना विविध योजनाकरीता नियोजनात्मक व सर्वकष मार्गदर्शन करणे.
  • स्थानिक प्राधिकरणाकडून विविध योजनांची मंजूरी करीता पाठपुरावा करणे.
  • जून्या वसाहतींच्या अभिन्यासातील जमिनीचे योग्यरित्या वापर होण्याच्या दृष्टीने अभिन्यास तयार करणे आणि अद्ययावत करण्याबाबत समन्वय साधणे.
  • विविध गृहनिर्माण योजनांकरीता प्राथमिक स्वरूपाचे अभिन्यास व इमारतीचे नकाशे तयार करणे.
  • विविध गृहनिर्माण योजनांचे तांत्रिक कर्मचार्‍यांकडून महानगर पालिकेकडे सादर करावयाचे नकाशे तयार करणे व प्रशासकिय मंजूरी प्राप्त करणे.
  • जून्या वसाहतीतील इमारतींचे पुनर्बाधणीचे प्रस्तावावर कार्यवाही करणे.
  • मंडळाच्या वसाह्तीमधील जून्या इमारतींच्या पुनर्बाधणी प्रस्तावांची छाननी व त्यानुसार "देकार पत्र" व "ना हरकत प्रमाणपत्र" देण्याबाबत कार्यवाही करणे.
  • प्राधिकरण धोरणानुसार करमणुकीचे मैदान, खेळाचे मैदान, उद्यान,फूटकळ भूखंड, ना फूटकळ ना स्वतंत्ररित्या विकासक्षम भूखंडांच्या वितरणाबाबत प्रस्तावांची छाननी करणे.
  • गाळ्यांच्या व भूखंडाच्या वापर बदलाबाबत प्रस्तावांची नियोजनात्मक दृष्टया कार्यवाही करणे.
  • विविध जून्या नकाशांचे अभिलेख तयार करणे.
  • इमारतीचे नकाशे अभिन्यासाचे नकाशे तसेच इतर नकाशांबाबत अभिलेख ठेवणे.
  • नकाशांचे अभिलेख संगणकाच्या सहाय्याने जतन करणे. सदर बाबतीत योग्य ती संगणक प्रणाली आणि स्कँनर घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
  • लेखापरिक्षकाच्या शेर्‍याबाबत नियोजनात्मक दृष्टया खुलासा करणे.
  • मुंबई मंडळासमोर/प्राधिकरणासमोर बाब टिप्पणी सादर करण्याबाबत कार्यवाही करणे.
  • न्यायालयीन प्रकरणामध्ये वास्तुशास्त्रीय व नियोजनात्मक दृष्टया विविध बाबीवर सहाय्य करणे.
  • संयुक्त प्रकल्प प्रस्तावांवर कार्यवाही करणे.
  • विभागातर्फे राबविण्यात येणार्‍या प्रकल्पाचे अभिन्यास तयार करणे, वर्किग ड्राँईग करणे आणि वास्तुशास्त्रीय नकाशे तयार करणे.
  • शासन संदर्भ, लक्षवेधी संदर्भ (WR), तसेच विधान सभा/ परिषद तारंकित / अतारांकित प्रश्न, आश्वासन, कपात सूचना, लक्षवेधी सूचनांची उत्तरे तयार करणे.
  • विविध प्रकरणांमध्ये विकास आराखडयानुसार आरक्षण, तसेच अभिन्यासाच्या आरक्षणाबाबत अभिप्राय देणे.
  • विविध भूखंडाचे क्षेत्रफळ दाखल्याचे रेखांकन तयार करणे.
  • माहिती अधिकार - २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जानुसार आणि कार्यालयातील उपलब्ध अभिलेखानुसार (वास्तुशास्त्रज्ञ विभागाशी संबधित ) माहिती पुरविणे.

संरचना

वित्त शाखेचे कामकाज वित्त नियंत्रकांच्या अधिपत्याखाली चालते. वित्त नियंत्रकांची नेमणूक महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातून प्रतिनियुक्ती द्वारे करण्यात येते आणि लेखाधिकारी व सहाय्यक लेखा अधिकारी हे कामकाजात सहाय्य करतात.

कार्ये
  • लेखा शाखेचे नियंत्रण करणे, सुसूत्रता राखणे.
  • वित्तीय अर्थसंकल्प व प्राधिकरणाच्या निधीचा विनियोग या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे.
  • वित्तीय बाबींवर सल्ला देणे.
  • वार्षिक लेखे तयार करून घेणे व लेखा आक्षेपांचे निराकरण करणे.
  • म्हाडा अंतर्गत कार्यालयाचे लेखापरीक्षण करणे.
  • माननीय उपाध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी / प्राधिकरण यांचेकडून प्राप्त झालेले विषय.

रचना

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या विधी विभागांत विधी सल्लागार/प्राधिकरण हे कार्यालय प्रमुख असून ते २ उप विधीसल्लागार ,६ सहाय्यक विधी सल्लागार, ३ विधी सहाय्यक यांच्या सहाय्याने विधी विषयक प्रकरणे हाताळत असतात.मुंबई शहराबाहेरील प्रादेशिक मंडळासाठी वकीलांची पँनेलवर नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मंडळासाठी न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र पँनेल नेमण्यात आलेले आहे.

विधी सल्लागार / प्रा.

कर्तव्ये व जबाबदार्‍या
  • विधी विभागाचे नियंत्रण, समन्वय आणि पर्यवेक्षण करणे.
  • प्राधिकरणाच्या आणि त्याचे विभागीय मंडळांच्या न्यायालयीन प्रकरणांवर देखरेख करणे.
  • महत्त्वाच्या प्रकरणांतील बाबींवर वरिष्ठ विधीज्ञांना [कौंन्सिल]माहिती देणे.
  • वरिष्ठ विधीज्ञांची विविध न्यायालयांमध्ये असलेल्या प्रकरणांबाबत प्राधिकरण आणि
    विभागीय मंडळांच्या वतीने नेमणूक करण्याची व्यवस्था करणे.
  • विविध प्रकरणांमधील शपथपत्रे, लेखी जवाब कैफियती ,उत्तरे इत्यादीचे मसुदे अंतिम करणे.
  • प्रधिकरण आणि त्याच्या विभागीय मंडाळांना विधीविषयक सल्ला देणे.
  • प्रधिकरण आणि विभागीय मंडाळांचे अभिहस्तांतरणाबाबतचे सर्व कामकाज पाहणे.
  • नियम आणि विनियम यांचे मसुदे व त्यामधील सुधारणांबाबत मसुदे तयार करणे.
  • उपाध्यक्ष तथा मु.का.अ./प्राधिकरण यांनी दिलेले अन्य कोणतेही काम करणे.

"विशेष सुचना":- विधी विभाग / प्राधिकरण केवळ प्राधिकरण आणि / अथवा विभागीय मंडळे अथवा त्यांचे अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजाबाबतच कायदेशीर मत / सल्ला / अभिप्राय देते. बाहेरील खाजगी वा अन्य व्यक्तीशी अथवा अधिकारी / कर्मचारी यांच्या खासगी बाबींबाबत ह्या विभागात विधी मत सल्ला / अभिप्राय दिले जात नाहीत

  1. प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे.
    • निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
    • भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
    • मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
    • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.

वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.

  1. मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
    • म्हाडा :प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर. :धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
    • भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.

संरचना

दक्षता विभागाचे प्रमुख मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी हे भारतीय पोलीस सेवा दर्जाचे अधिकारी आहेत. मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांना साहय करण्यासाठी शासनाने सहाय्यक पोलीस निरंक्षक यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे. तसेच तक्रार प्रकारणांच्या अन्वेषण कार्यास मदत होण्यासाठी म्हाडातर्फे दोन उप अभियंता यांची मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांच्या अधिपत्याखाली नेमणूक करण्यात आली आहे.महाराष्ट्रभर विखुरलेल्या प्रादेशिक मंडळांकडून प्राप्त झालेल्या तक्रारप्रकरणांचे अन्वेषण करण्याचे कार्य दक्षता विभागामार्फत केले जाते.

कार्य
  • समन्वय साधणे, देखरेख, दक्षता विभागाचे नियंत्रण.
  • पोलीस खात्याशी समन्वय साधणे.
  • अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात प्राप्त झालेले तक्रारींचे अन्वेषण करणे.
  • गृहनिर्माण भवन आणि मुंबई स्थित म्हाडा कार्यालयांची सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देखरेख करणे.
  • कार्यालयीन कामकाजाच्या व कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी म्हाडा परिसरावर नियंत्रण ठेवणे.
  • म्हाडा परिसरांतील प्रवेशावर नियंत्रण ठेवणे.
  • सर्व स्तरांतील म्हाडा कर्मचारी, एजन्सीज, सदनिका वितरण, म्हाडाच्या सदनिका व संक्रमण शिबिरांतील गाळे एजंटदवारे वितरित केले जाणे या सर्व बाबीच्या विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीचे दक्षतेच्या दृष्टीकोनातून अन्वेषण करणे.
  • दक्षता विभागाने शिफारस केलेल्या विविध प्रकरणांच्या चौकशीच्या प्रगतीचा आढावा घेणे.
  • वितरण विभाग, भू-व्यवस्थापन विभाग, एफ.एस.आय., टी.डी.आर. परवानगी, रक्कम जमा करण्याचा विभाग यांसारख्या भ्रष्टाचार घडू शकणार्‍या विभागांवर पाळत ठेवणे.
  • भ्रष्टाचार होवू शकणार्‍या आणि अतिसंवेदनशिल अशा विभागांना अचानक भेटी देणे.
  • अनधिकृतपणे कार्यंन्वित असलेल्या दलालांची यादी तयार करणे व त्यांना म्हाडा परिसरांतील प्रवेशांस प्रतिबंध करणे.
  • सचोटीबाबत साशंक असलेले कर्मचारी तसेच अनधिकृत दलालांच्या म्हाडामधील हालचाली यांवर पाळत ठेवणे.
  • सेट्रल व्हिजीलन्स कमिशन यांनी प्रसिध्द केलेले मार्गदर्शक तत्वांनुसार तसेच पी.एस.यु.मधील दक्षता व्यवस्थापनावर विशेष अध्यायानुसार आणि वेळोवेळी सेट्रल व्हिजीलन्स कमिशन यांनी प्रसिध्द केलेली परिपत्रके/ दुरूस्त्या यानुसार अमंलबजावणी करणे.
  • दक्षता विभागातील सर्व स्तरांवरील प्रकरणांच्या विनाविलंब कार्यपध्दतीबाबत खात्री करणे.
  • म्हाडाशी संबंधित तक्रारप्रकरणांच्या अन्वेषण कार्यास पोलीसांना सहकार्य करणे.
तक्रार सादर करण्याचे मार्ग

मुख्य दक्षता व सुरक्षा विभाग, दक्षता विभाग, चौथा माळा, गृहनिर्माण भवन, कलानगर, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

पुढील दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधणे.
दूरध्वनी क्र. : + ९१ २२ ६६४०५४४४ – मु.द.व सु.अ./प्रा.(विभागप्रमुख)
भ्रमण क्र. : ९८२०४९२८९०
फँक्स क्र. : + ९१ २२ २६५९२५४३ 
दूरध्वनी क्र. : +९१ २२ ६६४०५४४५ / +९१ २२ ६६४०५४४६ / +९१ २२ ६६४०५४४८

इ-मेलव्दारेही तक्रार सादर करू शकतात.
इ-मेल : cvsomhada@gmail.com

तक्रारदाराची माहिती व माहितीचे स्त्रोत हे पूर्णपणे गुप्त ठेवले जातील.