अभिहस्तांतरणा बाबतचे ११ टप्पे
-
टप्पा क्र.अभिहस्तांतरणाची प्रक्रीयाकार्यालयसंपर्क सुचि
-
१इमारतींची अंतिम विक्री किंमत अभियांत्रिकी विभागाकडून निश्चित केली जाते.अभियांत्रिकी विभाग / सहाय्यक भू व्यवस्थापक
-
२इमारतींची संस्था नोंदणी उपनिबंधक / सहकार कक्षाकडून केली जाते.उपनिबंधक / मुंबई मंडळ
-
३इमारतींचा नकाशा अभियांत्रिकी विभागाकडून तयार केला जातो.अभियांत्रिकी विभाग
-
४सहकारी गृह निर्माण संस्थेस विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराचे दस्त मान्यतेसाठी पाठवीले जातात.मिळकत व्यवस्थापक / समाज विकास विभाग
-
५सहकारी गृह निर्माण संस्थेने सर्वसाधारण सभेत विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराच्या दस्तास मंजूरी घेतात.सहकारी गृह निर्माण संस्था
-
६सहकारी गृह निर्माण संस्थेने दस्तास मंजूरी दिली परंतू काही प्रकरणे जमिन वा तत्सम बाबींसाठी प्रलंबीत राहतात.सहकारी गृह निर्माण संस्था
-
७सहकारी गृह निर्माण संस्थेने विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराच्या दस्तास मान्यता दिल्यावर मिळकत व्यवस्थापक कार्यालय संस्थेकडील मंडळाची थकीत रक्कमेचा तपशील तयार करतात.मिळकत व्यवस्थापक
-
८मिळकत व्यवस्थापक कार्यालयाकडून सहकारी गृह निर्माण संस्थेकडील थकीत रक्कमेबाबत लेखी अवगत करुन ती रक्कम भरुन घेतली जाते.सहकारी गृह निर्माण संस्था
-
९विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराचे दस्ताचे प्रारुप तयार करुन मिळकत व्यवस्थापक ते दस्त अंतीम स्वरुप देणेसाठी विधी सल्लागार/प्राधिकरण यांचे कडे पाठवतात.मिळकत व्यवस्थापक/ विशेष कार्य अधिकारी / उपमुख्य अधिकारी/ मुख्य अधिकारी / विधी सल्लागार
-
१०विधी सल्लागार /प्राधिकरण प्रस्तावाची छाननी करुन त्रूटयांबाबत पूर्तता करुन प्रस्ताव अंतीम केला जातो.मिळकत व्यवस्थापक
-
११विक्री करार व भू भाडे विलेखा कराराचे दस्त मुद्रांक शुल्क भरण्यासाठी तसेच निष्पादित करणेस संस्थेस दिले जातात.सहकारी गृह निर्माण संस्था मुद्रांक शुल्क कार्यालय