इमारतींना धोका निर्माण होण्याची चिन्हे व इमारती कोसळण्याच्या घटना यांची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व आवश्यक कार्यवाही करण्यासाठी, मंडळाने मुंबई येथील इमारत क्र. ८९-९५, रजनीमहल, तारदेव येथे २४ तास कार्यरत राहील असे नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी खालील दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत.

आपत्कालीन संपर्क क्रमांक :

1) दूरध्वनी क्रमांक - ०२२-२३५३६९४५ / ०२२-२३५१७४२३

2) मोबाईल क्रमांक - ९३२१६३७६९९

हेल्पलाईन क्रमांक :

1) दूरध्वनी क्रमांक - ०२२-६६४०५०००

या नियंत्रण कक्षामध्ये सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या दर्जाचे अधिकारी २४ तास हजर असतात. संदेश मिळाल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी जातात, इमारतीची पाहणी करतात व आवश्यक ती पुढील कार्यवाही करतात. तसेच, महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून प्राप्त झालेली माहिती संबंधित विभागीय अधिकाऱ्यांपर्यंत त्वरित पोहोचवली जाते व पुढील आवश्यक कार्यवाही केली जाते.