म्हाडा कायदा १९७६ अन्वये प्राधिकरणात एक अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि पाच अशासकीय सदस्य त्यांच्यापैकी एक प्राधिकरणांच्या कर्मचार्‍यांचा प्रतिनिधी असेल. हे सर्व राज्य शासनाकडून नियुक्त केले जातात. गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासनाचे सचिव आणि नागरी सुविधा विभागाचे सचिव हे प्राधिकरणाचे पदसिध्द अधिकारपरत्वे सभासद असतात. प्राधिकरणात आता एक अर्ध वेळ अध्यक्ष आणि पुर्ण वेळ उपाध्यक्ष असतो.उपाध्यक्ष हे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारीही असतात. किमान २ महिन्यातून एकदा प्राधिकरणांची बैठक असते. सात क्षेत्रिय मंडळे आणि विशेष मंडळे (मुं.इ.दु.व पु.मंडळ आणि मुं.झो.सु.मंडळ)ची स्थापना देखील राज्य शासनाकडून होते. प्रत्येक मंडळात एक अर्धवेळ सभापती एक उपसभापती आणि इतर अशासकीय सभासद नेमले जातात. विभागीय आयुक्त,महानगरपालिका आयुक्त (मुंबई वैतिरीक्त)आणि शहर रचना उपसंचालक हे देखील गृहनिर्माण मंडळाचे पदसिध्द अधिकारपरत्वे सभासद असतात.

सभापती हे अंशकालिक म्हणून नियुक्त करण्यात येतात तर उपसभापती हे पुर्णकालीक म्हणून नियुक्त करण्यात येतात. उपसभापती हेच मंडळाचे मुख्य अधिकारी असतात. प्राधिकरणात विविध विभागांना नेमून दिलेल्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी व प्रत्येक विभागात कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता प्रस्थापीत करण्यासाठी मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी, मुख्य अभियंता (I)(II); सचिव, वित्त नियंत्रक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कायदा सल्लागार, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजक हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष प्राधिकरण यांना सहकार्य करण्यासाठी नेमलेले असतात. म्हाडातील रोजचे कामकाज पार पाडण्यासाठी मान्य अधिकारी व कर्मचार्‍यांची आकृतीबंध अन्यवे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची प्रशासनाकडून नियुक्ती केली जाते.

अधिकार्‍यांस नेमून दिलेला कार्यभार पुढीलप्रमाणे:
  • अ.क्र.
    विभागांचे नाव
    विभागप्रमुख
  • १.
    प्रशासन
    सचिव
  • २.
    तांत्रिक विभाग
    मुख्य अभियांता-I, II आणि III
  • ३.
    मिळकत व्यवस्थापन
    उपमुख्य कार्यकारी अधिकारी
  • ४.
    वित्त व लेखा विभाग
    वित्त नियंत्रक
  • ५.
    विधी विभाग
    विधी सल्लागार
  • ६.
    दक्षता व चौकशी विभाग
    मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी
  • ७.
    नियोजन
    मुख्य वास्तूशास्त्र व नियोजनकार
  • ८.
    क्षेत्रीय मंडळ(म्हाडाचा घटक)
    मुख्य अधिकारी
  • ९.
    जनसंपर्क विभाग
    मुख्य जनसंपर्क अधिकारी
मंडळाची संरचना :

मंडळामध्ये एक सभापती, (अंशकालिक एक), उपसभापती (पुर्णकालिक) असतात. मंडळाचे उपसभापती हे मंडळाचे मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत असतात.

शासनाच्या सुचनेनुसार मंडळाचे सभासद नियुक्त केले जातात. जर राज्यसरकारने उपसभापती (अंशकालिक) यांची नियुक्ती केली नाही तर मंडळाचे मुख्य अधिकारी हे स्वंतत्रपणे नियुक्त केले जातात.

विभागीय मंडळांना स्वंतत्र संयुक्त दर्जा नसतो. ते विभागीय मंडळे प्राधिकरणाचे "कार्यकारी उपविभाग" म्हणून संबोधिले जातात. विभागीय मंडळाचे मुख्य अधिकारी हे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत असतात. मुख्य अधिकारी यांच्या हाताखाली पुरेसा तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचारी वर्ग कार्यरत असतो.