- प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत नियम/ अधिनियमम म्हाड अधिनियम १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे: -
- निवासी व अनिवासी सदनिका यांचे वितरण करणे.
- भूभाडे, भाडे तत्वाअतंर्गत वितरीत केलेल्या गाळेधारकांचे भाडे, सेवा आकार इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
- मालकीतत्वावर वितरीत केलेल्या इमार्तींचे अभिहस्तांतरण.
- संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
- म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.
वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.
- मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
- म्हाडा :प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
- मिळकत व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी :धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण,मिळकतीचे अभिहस्तांतरण.
- मिळकत व्यवस्थापनाअतंर्गत येणारी कामे :वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण,नियमितीकरण, देखभाल मिळकतीच्या नोंदणी ,महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निष्काशित करणे (घुसखोर) इत्यादी.
- भाडेवसूलीकार : प्रत्यक्षात भाडेवसूली व इतर येणी वसूली करणे, गाळा तपासणी करणे इ.