या विकल्पा अंतर्गत भोगवटादार / मालक मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन दुरुस्तीची कामे करतात. या विकल्पाअंतर्गत दोन प्रकारे कामे करण्यात येते. अ) परतावा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र. ब) विनापरतावा ना हरकत प्रमाणपत्र.
परतावा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र घेऊन करावयाच्या दुरुस्तीच्या कामांची कार्यप्रणाली पुढील प्रमाणे आहे.:
अ) परतावा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र.
- भोगवटाधारकांनी स्वत: पाहणी करून अथवा मंडळाच्या सूचनेनूसार दुरुस्तीसाठी आवश्यक त्या भागाची निश्चिती करणे.
- दुरुस्तीची कामे सुरू करण्यासाठी भोगवटाधारकांचे सहमती पत्र घेणे.
- भोगवटाधारकांनी ना हरकत प्रमाण पत्रधारकाची नेमणूक करणे.
- ना हरकत प्रमाण पत्र धारकाची संम्मती घेणे.
- मंडळाच्या पॅनलवरील वास्तू शास्त्रज्ञाची नेमणूक करणे.
- ना हरकत प्रमाणपत्र घेऊन करावयाच्या कामास वास्तूशास्त्रज्ञाची संम्मती घेणे.
- नर हरकत प्रमाणपत्र धारकाने उपरोक्त मुद्दा क्र.२ ते ४ ची पुर्तता करून वास्तूशास्त्रज्ञामार्फत कार्यकारी अभियंता यांना प्रस्ताव सादर करणे.
- अद्ययावत दुरुस्ती उपकरराचा भरणा मुंबई महानगर पालिकेस करणे.
- ना हरकत प्रमाणपत्रधारकाने ना हरकत प्रमाणपत्रासाठी मंडळाच्या शर्ति व अटी मंजूर असल्याबाबत रु.१००/- च्या मुद्रांक शुल्क पत्रावर हमीपत्र देणे. याच प्रकारचे हमीपत्र प्रत्येक भोगवटाधारकाकडून घेऊन वास्तुशास्त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने प्रमाणीत करून दाखल करणे (को-या कागदावर)
- अनधिकृत बांधकाम न करण्याबाबत रु.१०० च्या मुद्रांक शुल्क पत्रावर हमी पत्र सादर करणे.
- इमारतींची दुरुस्ती झाल्यावर मंडळाचे संक्रमण शिबीर रिकामे करून भाडेकरूंना दुरुस्ती झालेल्या इमारतीत दाखल करण्याबाबत रु.१०० च्या मुद्रांक शुल्कपत्रावर हमीपत्र सादर करणे.
- भाडेकरू / मालक यांच्या काही वाद किंवा न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, या बाबतचे शतीपूर्तीबंधपत्र रु.२००/- च्या मुद्रांक शुल्कपत्रावर सादर करणे.
- वास्तूशास्त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने प्रमाणीत केलेली भाडेकरूंची यादी.
- दुरुस्ती आवश्यक असलेल्या इमारतीच्या भागाचे छायाचित्र व प्रस्तावित दुरुस्ती दर्शविणारा इमारतीचा नकाशा.
- मंडळाच्या अधिका-यांकडून इमारतीची पाहणी व नाहरकत प्रमाणपत्र प्रदान करणे.
- आय.ओ.डी. व काम सुरू करण्याच्या दाखल्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडे अर्ज करणे.
- मुंबई महानगर पालिकेकडून आय.ओ.डी. व काम सुरू करण्याचा दाखला प्राप्त करणे.
- नाहरकत प्रमाणपत्रधारकाने कार्यकारी अभियंत्यांबरोबर contract agreement करणे.
- भाडेकरू व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणुक करणे.
- मंडळाच्या अधिका-यांनी वास्तुशास्त्रज्ञ, नाहरकत प्रमाणपत्रधारक व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने नेमणूक केलेल्या ठेकेदारासोबत द्वितीय संयुक्त पाहणी करणे आणि काम सुरू करणे.
- ना हरकत प्रमाणपत्रधारकाने दुरुस्तीसाठी केलेल्या खर्चाची वेळोवेळी प्रतीपूर्ती करणे.
- ७५% काम पूर्ण झाल्यानंतर तसेच सदर कामाच्या खर्चाची प्रतीपूर्ती झाल्यानंतर दुरुस्ती उपकर वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेस कळविणे.
ब) विना परतावा नाहरकत प्रमाणपत्र.
या विकल्पाअंतर्गत वरील अ मधील अनुक्रमांक १ ते १२ प्रमाणे कार्यप्रणाली आहे.
- ना हरकत प्रमाणपत्रधारक व भाडेकरू यांनी स्वखर्चाने दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याने झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती नाही.
- काम पूर्ण झाल्यानंतर दुरुस्ती उपकरामध्ये वाढ नाही.