परतावा अथवा विनापरतावा दुरुस्‍ती ना हरकत प्रमाणपत्रासाठी कार्यप्रणाली :-

मुंबई बेटावरील दुरुस्‍ती उपकरप्राप्‍त इमारतींच्‍या परतावा अथवा विनापरतावा दुरुस्‍ती ना हरकत प्रमाणपत्रासाठी पुढील प्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्‍यात येते.

  1. प्रस्‍ताव दोन प्रतींमध्‍ये सादर करण्‍यात यावा.
  2. प्रस्‍ताव दाखल करताना खालील माहिती देण्‍यात यावी :
    • इमारतीचे नाव
    • उपकर क्रमांक
    • इमारतीचा वर्ग
    • बांधकामाचा प्रकार.
    • मालकाचे नाव
    • मजल्‍यांची संख्‍या.
    • बांधकाम क्षेत्र.
    • रहिवाशी अथवा भाडेकरुंची संख्‍या. (निवासी + अनिवासी = एकुण)
    • इमारतीस दुरुस्‍तीची आवश्‍यकता आहे ?
    • असल्‍यास पुढील माहिती द्यावी :
    • टप्‍पा क्रमांक १/२/३/४
    • प्रशासकीय मान्‍यतेची किंमत
    • प्रशासकीय मान्‍यतेची तारीख
    • मागील टप्‍प्‍या पर्यंतचा दुरुस्‍तीचा खर्च रु.
    • झालेल्‍या खर्चा प्रमाणे दर प्रती चौरस मिटर.
    • अनुज्ञेय खर्चाची मर्यादा.
    • उपलब्‍ध निधी.
    • प्रस्‍तावाची थोडक्‍यात माहिती.
  3. किमान ७०% अधिकृत रहिवाशी किंवा भोगवटादारांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे का.... होय / नाही.
  4. ज्‍या भाडेकरू / भोगवटादार यांनी ना हरकत प्रमाणपत्रधारकाची नेमणूक केली आहे, ते अधिकृत भाडेकरू / भोगवटादार / मालक आहेत का?
  5. प्रस्‍तावित दुरुस्‍ती.
  6. उप अभियंता यांचे अभिप्राय.
  7. कार्यकारी अभियंता यांचे अभिप्राय.
  8. प्रस्‍ताव सादर करताना खालील कागदपत्रांच्‍या प्रमाणित छायांकित प्रती सादर करण्‍यात याव्‍यात. सदर प्रती राजपत्रीत अधिकारी / एस.ई.एम. किंवा अन्‍य अधिकृत व्‍यक्‍ती कडून प्रमाणित केलेल्‍या असाव्‍यात. सदर प्रती वास्‍तूशास्‍त्रज्ञाने प्रमाणित करु नयेत.
  9. भाडेकरुंचा अर्ज / ना हरकत प्रमाणपत्रधारकाचा अर्ज.
  10. वास्‍तूशास्‍त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाच्‍या नेमणूकीचे पत्र.
  11. वास्‍तूशास्‍त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाचे स्‍वीकृतीचे पत्र.
  12. खाली दिलेल्‍या तक्‍त्‍यामध्‍ये भाडेकरू / भोगवटादार यांची प्रमाणित यादी.
अ.क्र. घर / दुकान क्र. निवासी/अनिवासी मजला भाडेकरूचे / भोगवटादाराचे नाव वापर क्षेत्रफळ

भाडेकरू / भोगवटादारांची यादी संबंधीत उप अभियंता यांनी तपासावी, तसेच सदर यादी कार्यकारी अभियंता यांनी प्रमाणित करावी. उपअभियंता यांनी पुढील प्रमाणे प्रमाणित करावी.

भाडेकरू / भोगवटादारांची यादी मी तपासली आहे, व ती बरोबर आढळून आली.

वरील प्रमाणिकरण व खालील कागदपत्रांअभावी प्रस्‍तावाचा विचार केला जाणार नाही.

  • भाडेकरू / भोगवटादार यांच्‍यामध्‍ये परस्‍पर सामंजस्‍य असल्‍याबाबतचे रु.१०० च्‍या मुद्रांक शुल्‍क पत्रावर सामंजस्‍य करारपत्र.
  • भाडेकरू / भोगवटादार ना हरकत प्रमाणपत्रासाठी मंडळाच्‍या शर्ति व अटी मंजूर असल्‍याबाबत रु.१००/- च्‍या मुद्रांक शुल्‍क पत्रावर हमीपत्र.
  • मंजूर नकाशाप्रमाणे दुरुस्‍तीचे काम करण्‍यात येईल, तसेच दुरुस्‍तीचे काम करत असताना कोणत्‍याही प्रकारचे अ‍नधिकृत बांधकाम केले जाणार नाही, अश्‍या आशयाचे हमी पत्र रु.१०० च्‍या मुद्रांक शुल्‍क पत्रावर नाहरकत प्रमाणपत्रधारक / वास्‍तूशास्‍त्रज्ञ यांनी सादर करावे. दुरुस्‍तीचे काम सुरू असताना कोणत्‍याही प्रकारचे अ‍नधिकृत बांधकाम आढळून आल्‍यास नाहरकत प्रमाणपत्रधारक / वास्‍तूशास्‍त्रज्ञ यांना व्‍यक्‍तीश: जबाबदार धरण्‍यात येईल. अश्‍या परिस्थितीमध्‍ये वास्‍तुशास्‍त्रज्ञ आणि ठेकेदाराचे मंडळाकडे असणारे नोंदणीप्रमाणपत्र रद्द करण्‍यात येईल.
  • प्रस्‍तावित दुरुस्‍ती दर्शविणारा नकाशा..
  • अद्ययावत दुरुस्‍ती उपकर भरल्‍याचे दर्शविणारे दुरुस्‍ती उपकर देयक.