औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चा एक विभागीय घटक आहे. या विभागीय मंडळाची म्हाड अधिनियम १९७६ चे कलम १८ अन्वये दिनांक ०५ डिसेंबर १९७७ रोजी स्थापना झाली.

मंडळाचे विभागीय मुख्यालय मराठवाडा विभागात औरंगाबाद येथे असून औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि उस्मानाबाद हे आठ जिल्हे मंडळास जोडण्यात आलेले आहेत. हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबईच्या अधिपत्य व नियंत्रणाखाली कार्यरत आहे.