• अ) आर्थिक
    • विविध प्रकारचे देयके मंजूर करणे.
    • धनादेशांवर स्वाक्षरी करणे.
    • जमिन मह्सुल कायदयानुसार थकबाकीच्या वसूलीसाठी मागणी नोटीसा जारी करणे.
    • जप्ती अधिपत्रे जारी करणे.
    • प्रतिवेधक (मनाई आदेश) जारी करणे.
    • अधिकार प्रदानतेच्या अधिन राहून खर्चाच्या प्रमाणकावर स्वाक्षर्‍या करणे.
  • ब)प्रशासन व व्यवस्थापन
    • कार्यालयीन कामकाजावर देखरेख करणे.
    • अधिपत्याखालील कर्मचार्‍यांचे गोपनिय अहवाल लिहिणे.
    • विधानसभा / विधानपरिषद च्या तारांकीत / अतारांकित प्रश्नांना वेळेवर उत्तरे पाठविण्याची कार्यवाही करून घेणॆ.
    • मिळकत व्यवस्थापक कार्यालयाचा कार्यभार सांभाळणे, कार्यालयातील सहाय्यक कर्मचार्‍यांना मार्गदर्शन् व सल्ला देणे, त्यांच्यावर पर्यवेक्षण करणे व नियंत्रण ठेवणे.
      • मिळकत व्यवस्थापन कार्यालयाशी संबधित बाबीचा तसेच संदर्भित केलेल्या किंवा वरिष्ठ सक्षम प्राधिकारी यांनी निर्देशित केलेल्या व इतर बाबींचा निपटारा करणे
      • गाळे / भूखंड यांचे वितरण / अदलाबदल / हस्तांतरण / नियमितीकरण करणे.
      • वसाहतींना महिन्यातून सोईनुसार भेट देणे.
      • नियंत्रणाखालील पर्यवेक्षी भाडेवसुलीकार यांनी दिलेल्या अहवालाची चाचणी दाखल तपासणी करणे.
      • न्यायालयीन प्रकरणी आवश्यक त्यावेळी न्यायालयात उपस्थित रहाणे, म्हाडाच्या वकिलांना मंडळाची बाजू समजावून सांगणे. व न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे इ.
      • माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.
      • गाळे / भूखंड वितरण तसेच नियमितीकरण हस्तांतरण प्रकरणी आवश्यक त्या करारनाम्यावर स्वाक्षरी करणे.
      • मा. उपाध्यक्ष / प्राधिकरण, मा. सभापती व इतर वरिष्ठांच्या आढावा व इतर बैठकीस उपस्थित रहाणे, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचे निवारण करणे.
      • गाळे / भूखंड यांची वेळोवेळी जाहिरात देणे.
      • मा. अध्यक्ष / मा. उपाध्यक्ष / मा. मुख्य अधिकारी / मा. सभापती / मा.खासदार / मा.आमदार यांचे कडून प्राप्त झालेल्या पत्रांवर त्वरीत कार्यवाही करणे, शासन संदर्भ, अर्ध शासकिय संदर्भ, विधानसभा, विधानपरिषद संदर्भ, माहिती अधिकार, लोकाआयुक्त, मानवी हक्क आयोग व इतर महत्वाचे संदर्भाचा निपटारा करणे.
      • मंडळांतर्गत असलेल्या गाळे / भूखंड धारकांचे वैयक्तिक व इमारतींचे अभिहस्तांतरण करणे.
      • वरिष्ठांनी सोपविलेली कामे करणे.