उपमुख्य अभियंता (एस.आर.डी.)यांची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे :
- मुं.इ.दु.वपु. मंडळाने हस्तांतरीत केलेल्या मोकळ्या जमिनीवर संयुक्त गृहनिर्माण योजना राबवणे.
- सक्षम प्राधिकार्याकडून योजनांना प्रशासकीय मान्यता घेणे.
- गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने पूर्वरचित साहित्य वापरुन बांधकाम करणार्या अभिकर्त्याची नोंदणी प्रक्रिया करणे.
- म्हाडाचे ठरावानुसार कंत्राटदांरास स्विकृतीपत्र देणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नकाशांना मंजूरी मिळविणे व सक्षम प्राधिकार्याकडून आवश्यक परवानगी मिळविणे.
- सक्षम प्राधिकार्याची तांत्रिक मंजूरी घेणे.