- सक्षम प्राधिकार्याची मसुदा निविदा पत्रास मंजूरी घेणे.
- करारनामा झाल्यानंतर कंत्राटदारास कार्यादेश देणे.
- योजना सुरू करण्यासाठी मोकळी जमीन उपलब्ध करण्यासंबधी मुं.इ.दु. व पु. मंडळाशी पत्रव्यवहार करणे.
- बांधकाम पायाच्या स्थरासंबधी अभिलेख जसे नमुना परीक्षणासाठी खड्डा भोक पाडणे. व बांधकाम साहित्याचे चाचणी अहवाल.
- प्रगतीपथावरील योजनांच्या कामांवर देखरेख ठेवणे.
- कंत्राटदारास देण्यात आलेल्या (बांधकामाच्या तयारीकरिता अग्रिम), कंत्राटदारास अदा करण्यात आलेली चालू देयके आणि संबंधित रजिस्टर्स, अभिलेख ठेवणे.
- स्थानिक संस्थांशी जसे बृ.मुं.न.पा.,बेस्ट रिलायन्स एनर्जी इत्यादी स्थानिक संस्थांशी पाणी पुरवठा ,मल:निसारण जोडणी व विद्युत पुरवठा मिळणेबाबत पत्रव्यवहार करणे.
- भोगवटा प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी बृ.मुं.न.पा.चा इमारत प्रस्ताव विभागाशी पत्रव्यवहार करणे.
- योजनेतील रस्ते, पाणीपुरवठा, बाहय मल:निसारण आणि मोकळे भूखंड इत्यादी हस्तांतरण करण्यासाठी स्थानिक संस्थाशी (संबधित बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये) पत्रव्यवहार करणे.
- योजनेमध्ये बदल असल्यास सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करणे.
- मुं.इ.दु व पु.मंडळ यांना हस्तांतरीत केलेल्या संक्रमण सदनिकांच्या इमारतीबाबत अभिलेख ठेवणे.
- तात्पुरती विक्री किंमत/ अंतिम विक्री किंमती बाबत प्रस्ताव तयार करणे व सक्षम प्राधिकार्याची मंजूरी घेणे.
- सक्षम प्राधिकार्याची सेवा आकारास मंजूरी घेणे.
- विविध योजनेतील सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीरात प्रसिध्द करण्यासाठी संचालक /पणन यांना माहिती पुरविणे.
- यशस्वी लाभार्थ्याना हस्तांतरीत करण्यात आलेल्या सदनिकांची माहिती ठेवणे.
- सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी व इमारतीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी मिळकत व्यवस्थापक कार्यालयाशी पत्रव्यवहार करणे.