Functions And Duties - Mr

  1. प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे:-
    • निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
    • भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
    • मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
    • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.