M. B. R. & R. Board History - Mr

महाराष्‍ट्र शासनाने सन १९४० साली भाडे नियंत्रण कायदयानुसार गाळयांची भाडी सन १९४० च्‍या पातळीवर नियंत्रित केल्‍यामुळे मुंबई शहर बेटावरील भाडेतत्‍वावरील जुन्‍या मोडकळीस आलेल्‍या इमारतींच्‍या दुरुस्‍ती व पुनर्रचनेचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी सन १९६८ साली बेडेकर समितीची स्‍थापना केली. सदर समितीने केलेल्‍या शिफारशीनुसार शासनाने मुंबई इमारत घरदुरुस्‍ती व पुनर्रचना कायदा १९६९ मंजूर केला व या कायदयांतर्गत मुंबई इमारत दुरुस्‍ती व पुनर्रचना मंडळाची स्‍थापना सन १९७१ साली करण्‍यांत आली.