कर्तव्य व जबाबदार्‍या

कर्तव्य व जबाबदार्‍या
  • प्रशासकीय विभागात समन्वय नियंत्रण आणि देखरेख ठेवणे.
  • प्राधिकरणाच्या बैठकीचे व्यवस्थापन करणे व त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करणे.
  • अधिकारी/ कर्मचार्‍य़ांच्या आस्थापना विषयक बाबी बघणे.
  • प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील वेगवेगळ्या पदांची सरळसेवा भरती व पदोन्नतीबाबत.
  • ज्येष्ठतासूची

रचना

रचना

सचिव/ प्राधिकरण शाखेत सचिव हे मुख्य असुन त्यांची नेमणूक महसुल विभागातील अप्पर जिल्हाधिकारी या पदाशी समकक्ष अधिकार्‍याची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली जाते. सचिव/ प्राधिकरण यांच्या अखत्यारीत २ प्रशासकीय अधिकारी आणि इतर सहाय्यक, लिपीक वर्ग कार्यरत असतात. हया विभागामार्फत प्राधिकरणात समन्वय राखण्याचे काम केले जाते.प्राधिकरण तसेच प्राधिकरणांतर्गत असलेल्या ९ विभागीय मंडळातील आस्थापनाविषयक बाबींवर समन्वय नियंत्रण व देखरेख ठेवण्याचे काम देखील करण्यात येते.