जाहिराती:
- म्हाडाच्या विविध प्रादेशिक मंडळाच्या जाहिराती वर्तमानपत्रांना पाठविण्यात येतात त्या वर्तमानपत्रांशी संपर्कात राहून जाहिराती योग्यरित्या व योग्य दिवशी अचूक प्रसिध्द होतील याबाबत काळजी घेणे.
- मंडळाचे कर्मचारी व अधिकारी यांनी प्राधिकरणाच्या विविध प्रादेशिक मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेली माहिती पत्रके, पुस्तके, भिंत्तीपत्रके यादी तयार करण्याबाबत सहाय्य देणे.
- भूखंड आणि सदनिकांच्या वितरणासाठी तयार करण्यात येणार्या जाहिरातीमध्ये अशा जाहिराती तयार करण्यासाठी सहयोग देणे.
- जाहिरातीच्या पुस्तिका, माहिती पुस्तिका, अर्जाचे नमुने व त्यांच्या डिझाईन तयार करणे व याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना मदत करणे.
जनसंपर्क:
- सर्वसाधारण जनता म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजना, प्रकल्प तसेच अन्य तपशिलाबाबत चौकशी करीत असतात अशा चौकशीना उत्तरे देण्यासाठी उपलब्ध असणे.
- विविध विभागांच्या अधिकार्यांनी बोलविलेल्या बैठकीत सहभागी होणे.
- जनतेच्या माहितीसाठी प्रसारीत करण्यात यावयाची वृत्ते व अन्य तपशिल याची माहिती चौकशी कक्षात बसणार्या कर्मचार्यास देणे तसेच गृहनिर्माण भवनात होणार्या दैनंदिन घडामोडींची माहिती चौकशी कक्षात बसणार्या कर्मचार्यास देणे तसेच गृहनिर्माण भवनात होणार्या दैनंदिन घडामोडींची माहिती इच्छुक अभ्यागतास वेळेवर पुरविणे.
प्रसारमाध्यमे:
- प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व अध्यक्ष , सभापती व म्हाडाच्या प्रादेशिक मंडळाचे मुख्य अधिकारी यांच्या आदेशाने पत्रकार परिषदांचे आयोजन करणे.
- जनसंपर्क कार्यालयात आलेल्या विविध भाषेतील वर्तमानपत्राचे वाचन करून त्यामध्ये म्हाडाच्या संदर्भात जी काही माहिती असेल तो मजकूर अध्यक्ष / उपाध्यक्ष तसेच सभापती व संबधित अधिकार्यांना त्यांच्या माहितीसाठी त्याच दिवशी पाठविणे.
- म्हाडामध्ये होणार्या विविध कार्यक्रमावर आधारीत बातमीपत्रे तयार करणे त्याचबरोबर प्रसंगानुसार होणार्या घटना, मान्यवर अतिथींच्या भेट, म्हाडाची घटक मंडळे यामध्ये होणार्या कार्यक्रमाचे वृत्त संकलन करणे व त्यावर आधारीत बातमीपत्रे (प्रेस रिलीज) तयार करून ती वर्तमानपत्रांकडे प्रसिध्दीसाठी पाठविणे.
- वर्तमानपत्रांमध्ये म्हाडा संबंधात प्रतिकूल मजकूर प्रसिध्द झाल्यास अशा मजकूराबाबत संबंधित अधिकार्यांकडून खुलासा मागवून त्यावर आधारीत टिप्पणी / खुलासा / स्पष्टीकरण करून वृत्ताचे खंडण करून वर्तमान पत्रातून प्रसिध्दीस देणे.
शिष्टाचार:
- म्हाडाच्या विविध प्रकल्पाना भेट देण्यासाठी तसेच प्रत्यक्षात म्हाडा कार्यालयास भेट देण्यासाठी भारताच्या विविध राज्यांमध्ये असलेल्या गृहनिर्माण मंडळे यांचे अधिकारी व मान्यवर अतिथींना प्रत्यक्ष आणण्याची नेण्याची व्यवस्था करणे, त्यांची प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांबरोबर चर्चा होण्यासाठी भेट घटवून आणणे, त्यांना विविध प्रकल्पांना भेटी देण्यासाठी संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून प्रत्यक्ष प्रकल्पाचे जागी या मान्यवर अतिथींना घेवून जाणे, प्रकल्पाच्या भेटीसाठी या अतिथींची व्यवस्था संबंधित अधिकार्यांकडून करवून घॆणे.
साहित्य:
- म्हाडातर्फे दर तीन महिन्यांनी प्रकाशित होणार्या "परिसर परिचय" या ग़ृहपत्रिकेचे संपादन प्रकाशन, वृत्त संकलन, वाटप, पत्रव्यवहार आदी बाबी पाहणे.
- म्हाडातील विविध कार्यालयांतील दूरध्वनीची सूची तयार करून डायरी प्रसिध्द करणे.
अन्य कामे:
- २६ जानेवारी व १५ आँगस्ट या दोन महत्वाच्या राष्ट्रीय दिनी ध्वजवंदनाचे संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करणे, उदा: परिपत्रक, चहापाणी व्यवस्था, ध्वजारोहण व्यवस्था, अतिथींना ध्वज स्थानापर्यत इतमानाने घेवून जाणे इत्यादी शिष्टाचार.
- म्हाडाच्या विविध प्रादेशिक मंडळामार्फत काढण्यात येणार्या सोडतीच्या प्रसंगी उपस्थित राहाणे.