या विकल्पाअंतर्गत इमारतीची दुरूस्ती मंडळाने नेमलेल्या ठेकेदारातर्फे वास्तुविशारद व मंडळाच्या देखरेखीखाली करण्यात येते. सदर दुरूस्तीची कार्यप्रणाली पुढील प्रमाणे आहे:
- इमारतीतील दुरूस्तीच्या भागाची ओळख करणे, इमारतीचे सर्वेक्षण, रहिवाश्यांच्या तक्रारी, कंट्रोल रूममध्ये प्राप्त होणारे
संदेश, इत्यादींच्या द्वारे इमारतीतील दुरूस्तीच्या भागाची निवड करणे. - जरूरी असल्यास इमारतीची पाहणी करणे.
- वास्तुविशारदाची निवड करणे.
- इमारतीच्या मालकास म्हाडा अधिनियम कलम ८९ (I) अंतर्गत नोटीस देणे.
- इमारतीच्या रहिवाशांना म्हाडा कलम १०३ (ब) अंतर्गत सोसायटी तयार करून इमारतीचा ताबा घेण्यासंबंधात माहिती देणे.
- इमारतीचे रहिवाशी व मालक यांना इमारत दुरूस्तीसाठी घेण्याची माहिती देणे.
- इमारतीला टेकू लावणे व धोकादायक भाग तोडून टाकणे.
- इमारतीच्या रहिवाशांना व्हेकेशन नोटीस देणे व त्यांना पर्यायी जागेमध्ये स्थलांतरीत करणे.
- इमारतीच्या रहिवाशी व मालकाकडून कोणताही संदेश प्राप्त न झाल्यास त्या इमारतींची पहिली एकत्रित पाहणी करणे.
- वास्तुविशारदाकडून दुरूस्ती कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक प्राप्त करून घेणे.
- खर्चाची रक्कम प्रचलित दुरूस्ती कमाल मर्यादेच्या आत असल्यास किंवा प्रचलित मर्यादेवरील येणारी अतिरिक्त रक्कम रहिवाशांनी
अदा केल्यास अंदाजपत्रकास मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येते. - तांत्रिक मंजूरी, निविदा मान्यता व कामाच्या निविदा बोलावणे.
- महानगरपालिकेस चेकलिस्ट सादर करणे.
- इमारतीच्या मालकास नष्टशेप साहित्य विकत घेण्याबाबत कळविणे.
- कंत्राटदाराची नेमणुक करणे.
- इमारतीची दुसरी, एकत्रित पहाणी मंडळाचे अधिकारी, वास्तुविशारद, कंत्राटदार यांच्या सोबत करून दुरूस्ती कामास सुरूवात करणे.
- काम भौतिकदृष्टया ७५% पूर्ण झाल्यावर महानगरपालिकेस उपकार वाढविण्याबाबत कळविणे.