उपमुख्य अभियंता (प्रकल्प, नियोजन व संकल्पना) या परिमंडळाच्या अधिपत्त्याखाली येत असलेली महत्त्वाची कामे.
- मुंबई मंडळातील विविध गृहनिर्माण योजनांचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव आर्थिक वर्धनक्षमता तपासून शिफारशीसह मुख्य अभियंता - II / प्राधिकरण व माननीय उपाध्यक्ष / प्राधिकरण यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करणे.
- मुंबई मंडळातील विविध योजनांच्या तांत्रिक मंजूरीसाठी प्राप्त झालेली अंदाजपत्रके तांत्रिकदृष्टया तपासून सदर अंदाजप्रत्रके शिफारशीसह मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करणे.
- गृहनिर्माण योजनांचे प्रारूप निविदांचे प्रस्ताव, त्यातील तरतूदी व अभिप्रेत अर्थ तपासून मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करणे.
- विविध गृहनिर्माण योजनाकरीता अर्हता प्राप्त ठेकेदारांची नियुक्ती करण्याबाबत मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांनी प्रनिस विभागास निर्दिष्ट केलेल्या प्रस्तावांचा परिनिरीक्षण/छाननी अहवाल शिफारशीसह मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांना सादर करणे.
- मुंबई मंडळातील गृहनिर्माण योजनांचा बांधकाम कार्यक्रम, सुधारीत बांधकाम कार्यक्रम, अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मुख्य अधिकारी / मुंबई मंडळ व मुख्य अभियंता / प्राधिकरण यांना सादर करणे.
- विधिमंडळ अधिवेशन काळात प्राप्त होणार्या विधान सभा / विधान परिषद प्रश्नांची उत्तरे शासनास पाठवण्यासबंधात समन्वय साधणे व पर्यवेक्षण करणे.
- मुंबई मंडळाअंतर्गत विविध योजनांचा मासिक प्रगती अहवाल मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविणे.
- मुंबई मंडळाअंतर्गत विविध योजनांचा २० कलमी कार्यक्रम अहवाल पाठविणे.
- मुख्य अधिकार्यांच्या / विभाग प्रमुखांच्या बैठकीसाठी गृहनिर्माण योजना बाबतची तांत्रिक माहिती मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांना सादर करणे.
- विविध गृहनिर्माण योजनांकरीता तांत्रिक बाबीविषयी मुख्य अभियंता -II / प्राधिकरण यांना सहाय्य करणे.
- बंद झालेल्या गिरण्यांच्या जमिनीवर सुधारीत विकास नियंत्रण नियमावली कलम ५८ अंतर्गत म्हाडास प्राप्त झालेल्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरे व संक्रमण शिबीर यांच्या विकासाची कामे करणे.
- ब्रुहनमुंबइ महानगरपालिका हद्दीतील बन्द/आजारी गिरिणितील कामगारांची माहिती संकलमन मोहिम .
सारस्वत बँकेकडे अर्ज केलेल्या मिल कामगारांची यादी.