रचना
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या विधी विभागांत विधी सल्लागार/प्राधिकरण हे कार्यालय प्रमुख असून ते २ उप विधीसल्लागार ,६ सहाय्यक विधी सल्लागार, ३ विधी सहाय्यक यांच्या सहाय्याने विधी विषयक प्रकरणे हाताळत असतात.मुंबई शहराबाहेरील प्रादेशिक मंडळासाठी वकीलांची पँनेलवर नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मंडळासाठी न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र पँनेल नेमण्यात आलेले आहे.
विधी सल्लागार / प्रा.
कर्तव्ये व जबाबदार्या
- विधी विभागाचे नियंत्रण, समन्वय आणि पर्यवेक्षण करणे.
- प्राधिकरणाच्या आणि त्याचे विभागीय मंडळांच्या न्यायालयीन प्रकरणांवर देखरेख करणे.
- महत्त्वाच्या प्रकरणांतील बाबींवर वरिष्ठ विधीज्ञांना [कौंन्सिल]माहिती देणे.
- वरिष्ठ विधीज्ञांची विविध न्यायालयांमध्ये असलेल्या प्रकरणांबाबत प्राधिकरण आणि
विभागीय मंडळांच्या वतीने नेमणूक करण्याची व्यवस्था करणे. - विविध प्रकरणांमधील शपथपत्रे, लेखी जवाब कैफियती ,उत्तरे इत्यादीचे मसुदे अंतिम करणे.
- प्रधिकरण आणि त्याच्या विभागीय मंडाळांना विधीविषयक सल्ला देणे.
- प्रधिकरण आणि विभागीय मंडाळांचे अभिहस्तांतरणाबाबतचे सर्व कामकाज पाहणे.
- नियम आणि विनियम यांचे मसुदे व त्यामधील सुधारणांबाबत मसुदे तयार करणे.
- उपाध्यक्ष तथा मु.का.अ./प्राधिकरण यांनी दिलेले अन्य कोणतेही काम करणे.
"विशेष सुचना":- विधी विभाग / प्राधिकरण केवळ प्राधिकरण आणि / अथवा विभागीय मंडळे अथवा त्यांचे अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजाबाबतच कायदेशीर मत / सल्ला / अभिप्राय देते. बाहेरील खाजगी वा अन्य व्यक्तीशी अथवा अधिकारी / कर्मचारी यांच्या खासगी बाबींबाबत ह्या विभागात विधी मत सल्ला / अभिप्राय दिले जात नाहीत