
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सुधारित विकास नियंत्रण नियमावली ५८ अन्वये बंद गिरण्यांची मोकळी जमीन व उर्वरित (शिल्लक) चटई क्षेत्रफळापैकी अंदाजे १/३ हिस्सा प्रत्येकी म्हाडास, महानगर पालिकेस व गिरणी मालकास प्राप्त होतो. म्हाडास प्राप्त होणार्या जमिनीपैंकी ५०% जमीन सार्वजनिक योजना व ५०% जमीन गिरणी कामगारांच्या गृहनिर्माण योजनेकरिता वापरणे अपेक्षित आहे.
शासनाचे ०७/११/२००६ चे निर्णयानुसार सदर प्रकल्पाकरीता अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांकावर २००% पर्यत अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजेच अंदाजे शहरामध्ये ४ व उपनगरात ३ चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय आहे. त्यात सार्वजनिक गृहनिर्माण योजनेऎवजी संक्रमण गाळ्यांचे बांधकाम व गिरणी कामगारांच्या गृहनिर्माण योजना प्रस्तावित आहे. निर्णयानुसार अंदाजे २/३ गाळे गिरणी कामगारांकरिता व १/३ गाळे संक्रमण गाळे म्हणून बांधण्यात येतील.
सुधारित विकास नियंत्रण नियमावलीनुसार ३६ मिल मध्ये म्हाडास १५.७८ हेक्टर जमिन प्राप्त होणार आहे.
वरील प्राप्त होणार्या जमिनीपैकी २७ मिलचे २२ ठिकाणी ९.६९ हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मंडळाने घेतला आहे. म्हाडास प्राप्त होणार्या १५.७८ हेक्टर जमिनीवर अंदाजे २४५०० गाळ्यांचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्यापैकी अंदाजे १६५०० गाळे गिरणी कामगारांकरीता व ८००० गाळे संक्रमण गाळे म्हणून असतील ( गिरणी कामगार आणि संक्रमण गाळे यांची अंदाजे विभागणी २/३ : १/३ ) सदर योजनेतील गाळ्यांचे चटई क्षेत्र २२५ चौ. फुट राहणार आहे.
सदर जमिनीवरील ११ ठिकाणी १०१६५ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे.
एकूण १२००० गाळ्यांच्या कामाकरिता म्हाडास जे.एन.- एन.यु.आर.एम. अंतर्गत मंजूरी प्राप्त झाली आहे व सदर बाबत केंद्र शासनाचे अनुदान रू. २.०६ लाख प्रति गाळा मंजूर झाला आहे.
योजनेचे नाव : स्वान मिल, शिवडी येथे गिरणी कामगारांसाठी सदनिका व संक्रमण सदनिकांचे बांधकाम.
ठिकाण : स्वान मिल, शिवडी.
योजनेचा प्रकार : गिरणी कामगारांसाठी सदनिका व संक्रमण सदनिका
एकुण सदनिका : ७१४
प्रति सदनिका चटई क्षेत्रफळ २२५
प्रति सदनिका खोल्या : १ बी.एच.के (बैठकीची खोली + शयन गृह + स्वंयपाक घर)
बांधकामाची सद्यस्थिती : काम पुर्ण झाले आहे.
सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- विट्रीफाइड टाईल्सचे फ्लोरीग
- सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या
- स्वयंपाकाचा ओटा ग्रेनाईट बांधकामामध्ये व स्टेनलेस स्टीलचे सिंक
- कन्सील प्लबिंग
- पुर्ण अँक्रेलिक बाहयरंगकाम
- आतील रंगकाम आँईल बाऊंड डिस्टेंपर मध्ये
- प्रति इमारत दोन /तीन स्टेनलेस स्टीलचे उदवाहन
- उदवाहनाकरिता आपत्कालीन पाँवर जनरेटर सेट
अ.क्र. | मिलचे नाव | एकूण भूखंडाचे क्षेत्र,चौ.मी.मध्ये | एकूण गिरणी कामगारांच्या सदनिका | एकूण संक्रमण सदनिका | एकुण गा/दु | जमिन ताब्यात घेतल्याची तारीख | शेरा |
१. | स्वान मिल (शिवडी) | ४१०३.०३ | ४७६ | २३८ | ७१४ | २६/०८/२००८ | काम पुर्ण झाले आहे. |



View Other Projects
-
Ekta Nagar, Malwani, Malad (W)
-
Village Charkop, Kandivali (W), Mumbai
CTS No-3/A/1 plot No-3 of Village Charkop, Kandivali (W), Mumbai
-
Shimpavali, Kandivali (W), Mumbai
-
43 LIGI T/s, 17 LIG II T/S 17 Shops & 10 Offices on S.No.517, 520, 521 & 523 Satpur Nashik
S.No.517,520,521 & 523 Trimbak Road, Satpur, Nashik.
-
Bimbisarnagar, Goregaon (E) - Mumbai
-
Ekta Nagar, Malwani, Malad (W)
-
Village Charkop, Kandivali (W), Mumbai
CTS No-3/A/1 plot No-3 of Village Charkop, Kandivali (W), Mumbai
-
Shimpavali, Kandivali (W), Mumbai
-
43 LIGI T/s, 17 LIG II T/S 17 Shops & 10 Offices on S.No.517, 520, 521 & 523 Satpur Nashik
S.No.517,520,521 & 523 Trimbak Road, Satpur, Nashik.
-
Bimbisarnagar, Goregaon (E) - Mumbai
-
Ekta Nagar, Malwani, Malad (W)