1. लोकसेवार्थ निवारा पुरविणे. (घरकुल, भुखंड, दुकाने इत्यादी.)
  2. शासनाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्प राबविणे जसे लोक आवास योजना, वँम्बे योजना, राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार प्रकल्प, एकात्मिय गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार प्रकल्प (आए.एच.एस.डी.पी.), शहरी गरीबांसाठी मुलभूत सुविधा योजना(बी.एस.यु.पी.), राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना भाग-१ व भाग-२ इत्यादी.
  3. गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विविध स्त्रोतांन्वये जसे कमाल जमिन धारणा कायदा, कलम४१, कलम ५२ महानगरपालिकांचे अत्यल्प उत्पन्न गटासाठीचे आरक्षण व महानगरपालिकांचे गृहनिर्माणसाठाची जागा इत्यादी मार्गांनी जमिन उपलब्ध करुन घेणे.
[view_1]
  1. प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे: -
    • निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
    • भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
    • मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
    • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.

      वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.

  2. मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
    • म्हाडा : प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर. : धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ : वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
    • भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.