- म्हाडाची मिळकत व्यवस्थापन विषयक कर्तव्ये व जबाबदार्या म्हाड अधिनियम १९७६ चे प्रकरण IV मध्ये विशद केलेली आहे. सदर कर्तव्ये व जबाबदार्या पार पाडण्यासाठी उक्त अधिनियमास अनुसरुन नियम व विनियम तयार केलेले आहेत. मिळकत व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असे आहे.
- निवासी व अनिवासी गाळे आणि भुखंड वाटप करणे.
- भूईभाडे, सेवाआकार, भाडेखरेदी हप्त्याची आकारणी व वसूली करणे.
- मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
- उपकराधारित जून्या इमारती पूनर्बांधणी करिता अधिगृहीत केल्यानंतर त्या इमारतीतील गाळेधारकांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांचे वाटप करणे तसेच अशा इमारतींची पुनबांधणी केलेल्या इमारतीतील गाळे त्यांना वाटप करणे.
- वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे आणि सामायिक सुविधांचे व्यवस्थापन करणे.
वरील सर्व कामे मंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत अंमलात आणली जातात.
- मिळकत व्यवस्थापन कार्याची अंमलबजावणी व सनियंत्रण हे पुढे नमूद केलेल्या चार वेगवेगळ्या स्तरावरून होते:
- म्हाडा :धोरण निश्चित करणे, प्रादेशिक मंडळाने केलेल्या सर्व कार्याचा आढावा घेणे व सनियंत्रण ठेवणे, प्रादेशिक मंडळाच्या कार्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे.
- मिळकत व्यवस्थापन विभाग असलेली मुख्य कार्यालये आणि उपमुख्य अधिकारी/ मिळकत व्यवस्थापक यांचे अधिपत्याखालील प्रभाग: म्हाडाच्या धोरणाची अमंलबजावणी, वाटपापूर्वीची कार्यपध्दती, वाटप करावयांच्या गाळ्यांसंबंधीत मिळकत व्यवस्थापनाचे कार्य संनियंत्रित करणे आणि प्रादेशिक मंडळांतर्गत मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
- मंडळाचे मिळकत व्यवस्थापन विभाग : गाळे वाटपाशी संबंधित काम, क्षेत्रिय काम, वसाहतीचे दस्तऎवज, थकबाकी वसूली, गाळे नियमितीकरण, काळजीवाहू परवानगी, मालमत्ता नोंदवह्या अदयावत ठेवणे, नगर पालिकांचे पाणीपट्टी देयक अदायगी इत्यादी संबंधिची कार्यवाही करणे, भाडेवसूली नोंदवहया अदयावत करणे. थकबाकीदाराविरूध्द कार्यवाही सूरू करणे, थकबाकीचे सूचनापत्र देणे,
अनाधिकृत अधिगृहित सदनिका शोधून काढणे इत्यादी. - भाडे वसूलीकार : क्षेत्रीय स्तरावरील या अधिकार्यांचा मुख्यत: भाडे, सेवाआकार, मासिक भाडे खरेदी हप्ता, इत्यादीची प्रत्यक्षात वसूली करणे, तसेच पर्यवेक्षण व नियमित कामामध्ये सहभाग असतो.
मागणी अजमाविण्यासाठी रिक्त गाळ्यांची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ. क्र. |
योजनेचे ठिकाण | रिक्त सदनिकांची वर्गवारी | दुकाने | कार्यालयीन कक्ष | ||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
सर्व साधारण | अ.जा. | अ.जमाती | विमुक्त जमाती | भटक्या जमाती | ||||
१ | १४ गाळे मध्यम उत्पन्न गट, बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर | ० | -- | १ | -- | १ | -- | -- |
२ | ८५ गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर | ८ | ० | ५ | १ | -- | -- | -- |
३ | १३ गाळे अल्प उत्पन्न गट, वडसा, देसाईगंज, गडचिरोली | ७ | -- | -- | -- | -- | -- | -- |
४ | ४८ गाळे अल्प उत्पन्न गट, वांजरा, नागपूर | १ | -- | २ | १ | -- | -- | -- |
५ | ४३ गाळे, मध्यम उत्पन्न गट, बोरगाव, नागपूर | १ | -- | -- | -- | -- | -- | -- |
६ | १०० गाळे, अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर, नागपूर | १ | ५ | ५ | १ | १ | -- | -- |
७ | ४५/१७ गाळे, मध्यम उत्पन्न गट,सर्वसेवासंघ जमिन,वर्घा | -- | १ | -- | -- | -- | -- | -- |
एकूण | २५ | ६ | १३ | ३ | २ | -- | -- |
मागणी अजमाविण्यासाठी रिक्त भुखंडाची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ. क्र. |
योजनेचे ठिकाण | रिक्त सदनिकांची वर्गवारी | दुकाने | कार्यालयीन कक्ष | ||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
सर्व साधारण | अ.जा. | अ.जमाती | विमुक्त जमाती | भटक्या जमाती | ||||
१ | ७ अल्प उत्पन्न गट, वडसा देशाईगंज, गडचिरोली | ७ (निविदाद्वारे) | -- | -- | -- | -- | -- | -- |
एकूण | ७ | -- | -- | -- | -- | -- | -- |
मागणी अजमाविण्यासाठी २% शासन स्वेच्छाधिकारा अंतर्गत रिक्त गाळ्यांची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.क्र. | योजनेचे नाव | रिक्त गाळ्यांची संख्या |
१ | ५०/६१ गाळे मध्यम उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर | १ |
२ | ५०/१९० गाळे मध्यम उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर | १ |
३ | २०३ गाळे अल्प उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर | ३ |
४ | ८६ गाळे अल्प उत्पन्न गट, एम.आय.डी.सी नागपूर | १ |
५ | १०७ गाळे अल्प उत्पन्न गट , बुटीबोरी, नागपूर | २ |
६ | ३२६ गाळे अल्प उत्पन्न गट , गोधनी, नागपूर | ३ |
७ | १०० गाळे अल्प उत्पन्न गट, बुटीबोरी,नागपूर | २ |
८ | ७५/१३० गाळे अल्प उत्पन्न गट , डवलामेटी, नागपूर | १ |
९ | ११४ गाळे अल्प उत्पन्न गट , बुटीबोरी, नागपूर | २ |
१० | ५३ गाळे मध्यम उत्पन्न गट, वर्धा, नागपूर | १ |
११ | ५० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा | १ |
१२ | ७० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा | १ |
१३ | १३० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा | १ |
१४ | १००/६० गाळे अल्प उत्पन्न गट, नविन चंद्रपूर | १ |
१५ | ९१ गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर | १ |
१६ | १०० गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर | २ |
१७ | १०० गाळे अत्यल्प उत्पन्न गट , डवलामेटी, नागपूर | २ |
१८ | १०० गाळे अल्प उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर | २ |
एकूण | २७ गाळे |
मागणी अजमाविण्यासाठी २% शासन स्वेच्छाधिकारा अंतर्गत रिक्त भुखंडाची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.क्र. | योजनेचे नाव | रिक्त भूखंडाची संख्या |
१ | ७० भूखंड मध्यम उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर | १ |
२ | ३१२ भूखंड अल्प उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर | ५ |
३ | १४२/६३ भूखंड अल्प उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर | १ |
४ | २५०/२७० भूखंड, अल्प उत्पन्न गट, लावा, नागपूर | ५ |
५ | २०५ भूखंड, अल्प उत्पन्न गट कळमेश्वर, जिल्हा नागपूर | ३ |
६ | २२६ भूखंड अल्प उत्पन्न गट वर्धा, नागपूर | १ |
७ | १६४ भूखंड अल्प उत्पन्न गट, भंडारा | २ |
८ | १२० भूखंड अल्प उत्पन्न गट डवलामेटी, जिल्हा नागपूर | २ |
९ | २१० भूखंड अत्यल्प उत्पन्न गट गोधनी, नागपूर | ४ |
एकूण | २४ भूखंड |
२% शासन स्वेच्छाधिकार कोटयातील सदनिका/रिक्त भुखंड दर्शविणारा वर्ष निहाय तक्ता, गोषवार व त्यापासून अडकलेला निधि(माहे ओगस्ट, २०१२ अखेर).
No Data
रिक्त गाळे/भुखंड/दुकाने यांचा मासिक तपशिल दर्शविणारा(माहे ओगस्ट, २०१२ अखेरचा तक्ता).
No Data