उपक्रम

प्रादेशिक मंडळे ही प्राधिकरणाची स्वतंत्र कार्यबाहू आहे. प्राधिकरण ही एक स्थायी स्वरूपाची व स्वतंत्र मुद्दा असणारी सांविधिक संस्था असल्यामुळे तिच्या अधिपत्याखाली काम करणार्‍या प्रादेशिक मंडळाच्या ध्येय धोरणाच्या चौकटीत राहून तसेच प्राधिकरणाने वेळोवेळी विहित करत असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करावे लागते.

  1. गृहनिर्माण योजना:- अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट अशा विविध उत्पन्न गटासाठी गाळे/ भुखंड / व्यापारी संकुल अशा घरकुलांची बांधकामे.
  2. गलिच्छ वस्ती सुधारणा कार्यक्रम
    • लोक आवास योजना
    • वाल्मिकी आंबेडकर आवास योजना
    • जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजना
    • एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम
    • राष्ट्रीय झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम
    • खान्देश विकास योजना
  3. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. १(दारिद्रय रेषेखालील
    व्यक्तीसाठी)
  4. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. २(दारिद्रय रेषेवरील व्यक्तीसाठी)
  5. भुसंपादन