प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी म्हाडा हि संस्था "बाँम्बे हाऊसिंग बोर्ड" या नावाने ओळखली जात होती, व या भारतातील पहिल्या गृहनिर्माण संस्थेची स्थापना १९४९ साली त्यावेळेच्या मुंबई इलाक्याचे कामगारमंत्री श्री. गुलझारीलाल नंदा यांनी केली. या संस्थेच्या अधिपत्याखाली विदर्भ वगळता संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील गृहनिर्माणाचा कार्यक्रम राबविला जात होता.

मंडळाने सर्वप्रथम १९५० साली खार येथे अल्प उत्पन्न गटासाठी ३५० चौ. फूट क्षेत्रफळाची सदनिका असलेली वसाहत बांधली. त्याकाळात स्वंयपूर्ण घराची संकल्पना रूढ नसल्यामुळे या योजनेस आवश्यक तो प्रतिसाद मिळाला नाही. परंतु दरम्यानच्या काळात गावांतून, शहरात स्थलांतर होऊ लागल्यामुळे मुंबईमधील घरांची गरज वाढू लागली व स्वंयपूर्ण घरांची संकल्पना रूढ होऊ लागली. या दरम्यान मुंबईच्या पूर्व उपनगरात तसेच मुंबई शहरात मोठयाप्रमाणात औदयोगिक कामगार गृहनिर्माण योजना राबविण्यात आली. अशाप्रकारे या मंडळाने समाजातल्या विविध स्थरांतील लोकांसाठी निरनिराळ्या गृहनिर्माण योजना राबविल्या. या गृहनिर्माण योजनांचा ताबा देणे व देखभाल करण्याचे काम ही याच मंडळाने स्वीकारले.

तदनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. त्याचवेळी बाँम्बे हाऊसिंग बोर्डचे रूपांतर "महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ" या संस्थेत झाले. व त्याचवेळी विदर्भ हाऊसिंग बोर्ड या संस्थेची ही स्थापना तत्कालीन मध्यप्रदेश गृहनिर्माण मंडळाच्या जागी झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाने मुंबई, पुणे व इतर शहरात अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी स्वंयपूर्ण घरांच्या अनेक योजना राबविल्या.

महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाने बांधलेली सुमारे १०,५०० सदनिका असलेली कन्नमवारनगर ही देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण वसाहत ठरली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाने मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर या शहरात मोठमोठया गृहनिर्माण वसाहती बांधल्या. प्रत्येक वसाहतीमध्ये मंडळाने वसाहतीच्या आवश्यक त्या सुविधासाठी जसे शाळा, दवाखाने, बाजार, उदयान, हाँस्पिटल इत्यादी सुविधासाठी भूखंड आरक्षित ठेवले व मंडळाच्या भूखंड वितरण विनियमानुसार त्या जमिनीचे पात्र अशा संस्थाना वाजवी दरात वितरण केले. व या संस्थानी वसाहतीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

औदयोगिकरण, स्थलांतरण व वाढती लोकसंख्या यामुळे मंडळाने बांधलेली गृहनिर्माण प्रकल्प अपुरे पडू लागली. त्यामुळे मंडळाच्या वसाहती शेजारी मोकळया जागेवर अनधिकृत झोपडया उभ्या राहू लागल्या. शासनाने सुरवातीला गलिच्छ वस्ती निर्मुलन योजना राबविल्या लागल्या. परंतु वाढत्या झोपडपट्टयाचे प्रमाण वाढू लागल्याने या योजना प्रभावीपणे कार्यांन्वित होत नव्हत्या. यासाठी १९७४ साली शासनाने महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधार मंडळ स्थापन केले.भाडे नियंत्रण कायदयामुळे खाजगी मालकीच्या इमारतींमधील घरांची भाडी १९४० सालच्या दराने गोठविली गेली. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील घरबांधणी जवळजवळ बंद झाली.तुटपुंज्या मिळणार्‍या भाडयामध्ये घरमालकांना इमारतींची दुरूस्ती व देखभाल करणे शक्य होत नव्हते.

परिणामत: मुंबई शहरातील जुन्या इमारती कोसळू लागल्या. साधारणपणे १९६५ च्या सुमारास मुंबई शहरातील इमारती मोठयाप्रमाणात कोसळून मुंबईच्या जडणघडणीमध्ये महत्वाचा सहभाग असलेला कामगार वर्ग व मध्यमवर्ग मराठी माणूस मोठयाप्रमाणात बेघर होण्याची भीती निर्माण झाली.या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने बेडेकर समितीची नियुक्ती केली. या समितीच्या शिफारशींनुसार मुंबईमधील १९,६४२ खाजगी इमारतीतींल भाडे तत्वावर राहणार्‍या रहिवाशांच्या निवार्‍यास संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळाने १९५९ साली "मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना" हा ऎतिहासीक कायदा आणला.व या कायदयाच्या अंमलबजावणीसाठी "मुंबई इमारती दुरूस्ती व पुनर्रचना" या स्वतंत्र मंडळाची स्थापना केली. या कायद्यान्वये मुंबईमधील सर्व इमारतींना दुरूस्ती उपकर लावण्यात आला व या उपनगरातून तसेच शासनाकडून मिळणार्‍या अनुदानामधून मुंबई शहरातील जुन्या इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू केले.

Mhada History

अशाप्रकारे त्याकाळात महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ ही चार मंडळे महाराष्ट्रात स्वतंत्रपणे निवारापूर्तीचे काम करत होते.

या चारही मंडळाचे काम जवळजवळ समांतरपध्दतीचे होते. प्रत्येक मंडळाच्या साधनसामुग्री व प्रशासकीय बाबी व निधी उभारण्यामध्ये मर्यादा होत्या. त्यामुळे हे काम योग्यत्यागतीने होत नव्हते. शासनाने या बाबीचा सर्वंकष विचार करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ अन्यव्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांची म्हणजेच "म्हाडा" ची ५ डिंसेबर १९७७ रोजी स्थापना केली व निवारापूर्तीचे काम करणारी सर्व मंडळे म्हाडामध्ये विलीन करण्यात आली.

म्हाडा ही स्वायत्त संस्था असून महाराष्ट्रातील गृहनिर्माण धोरण व त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची उभारणी स्वबळावर करते. म्हाडाच्या गृहनिर्माण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडाअंतर्गत महाराष्ट्रात ९ विभागीय मंडळाची स्थापना केली आहे.

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ.

सुचना :

  • अऔगृयो - अनुदानीत औद्योगीक गृहनिर्माण योजना
  • आदुवि - आर्थिकदृष्टया दुर्बल विभाग
  • अल्प - अल्प उल्पन्न गट
  • मध्यम - मध्यम उत्पन्न गट
  • उच्च - उच्च उत्पन्न गट
  • गृहनिर्माण योजना - सदनिकेचे बांधकाम आणि भूखंडांचा विकास
मिळकत व्यवस्थापक- I
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    गृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे )
  • नेहरू नगर (कुर्ला पूर्व)
     
  • नेताजी नगर (कुर्ला पूर्व)
     
  • विनोबा भावे नगर (कुर्ला पूर्व)
     
  • टिळक नगर, चेम्बुर
     
  • नवीन टिळक नगर, चेम्बुर
     
  • पंत नगर, घाटकोपर
     
  • चिंत्तरंजन नगर, घाटकोपर
     
मिळकत व्यवस्थापक- II
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    गृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे )
  • आदर्श नगर, जोगेश्वरी
     
  • आनंद नगर,सांताक्रुझ
     
  • अराम नगर, अंधेरी
     
  • आजाद नगर, अंधेरी
     
  • चैतन्य नगर, सांताक्रुझ
     
  • चक्की खाना,सांताक्रुझ
     
  • दिंडोशी, मालाड
     
  • डि.एन. नगर , अंधेरी
     
  • धाके काँलनी, अंधेरी
     
  • १०
    जी.व्ही.पी.डी. पार्ले
     
  • ११
    मजासवाडी, जोगेश्वरी (सर्वोदय नगर)
     
  • १२
    मागाठाणे,बोरीवली
     
  • १३
    निर्मल नगर, बान्द्रा
     
  • १४
    नित्यानंदा नगर, अंधेरी
     
  • १५
    ओशिवरा/ मेगा प्रोजेक्ट, अंधेरी- जोगेश्वरी
     
  • १६
    पाटलीपुत्र नगर, गोरेगाव
     
  • १७
    रामकृष्णा नगर, खार
     
  • १८
    समता नगर, कांदिवली
     
  • १९
    सुंदर नगर, कलिंना
     
  • २०
    सहार टाँवर , अंधेरी
     
  • २१
    टिचर काँलनी, बांन्द्रा
     
  • २२
    वैभव पँलेस (ओशिवरा)
     
  • २३
    विजय नगर, बांन्द्रा
     
मिळकत व्यवस्थापक- III
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    गृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे)
  • टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
     
  • कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व)
     
  • चांदिवली / पवई
     
  • पवई
     
  • सहकार नगर, चेम्बुर
     
  • सुभाष नगर, चेम्बुर
     
  • वडवली, (चेम्बुर)
     
  • मुलुंड(मिठाघर रोड)
     
  • मुलुंड(नाहुर)
     
  • १०
    मुलुंड (नवघर रोड)
     
  • ११
    पी.एम.जी.पी. (कांदिवली)
     
  • १२
    पी.एम.जी.पी.(मुलुंड)
     
  • १३
    पी.एम.जी.पी. (धारावी)
     
मिळकत व्यवस्थापक -IV
सिद्धार्थ नगर
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    गृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे )
  • ३९८ सदनिका मध्यम सिद्धार्थ नगर
     
  • २८० सदनिका मध्यम सिद्धार्थ नगर
     
  • २२४ सदनिका ए+बी प्रकार सिद्धार्थ नगर
     
  • ६६६/८०८ सदनिका सिद्धार्थ नगर १,२
     
  • ४७२ सदनिका सिद्धार्थ नगर ३ IW
     
  • ४४८ सदनिका सिद्धार्थ नगर IV
     
  • १२०/४८० सदनिका सिद्धार्थ नगरr VI ईमारत क्र. २९,३०,३४
     
  • ४०/४८० सदनिका सिद्धार्थ नगर VI ईमारत क्र. ३१
     
  • ८०/४८० सदनिका सिद्धार्थ नगर ईमारत क्र. ३२,३३
     
  • १०
    २४०/४८० सदनिका सिद्धार्थ नगर VI ईमारत क्र. ३५,३६,३७
     
  • ११
    १६८ सदनिका सिद्धार्थ नगर V
     
  • १२
    ४८/८० सदनिका सिद्धार्थ नगर VII ईमारत क्र. ३८
     
  • १३
    ३२/८० सदनिका सिद्धार्थ नगर VII ईमारत क्र. ३८ (अनिवासी)
     
  • १४
    १०० सदनिका सिद्धार्थ नगर उच्च
     
  • १५
    ४० सदनिका सिद्धार्थ नगर उच्च
     
  • १६
    १६ सदनिका सिद्धार्थ नगर (१ रिकामे)
     
  • १६ ए
    १८ दुकाने सिद्धार्थ नगर अल्प
     
मोतीलाल नगर
  • १७
    ७०० सदनिका मोतीलाल नगर
     
  • १८
    २२७४ सदनिका मोतीलाल नगर
     
  • १९
    ७२६ सदनिका मोतीलाल नगर
     
  • २०
    १६ सदनिका मोतीलाल नगर
     
महावीर नगर
  • २१
    ३० सदनिका महावीर नगर
     
  • २२
    ९४६ सदनिका महावीर नगर
     
  • २३
    ११२ सदनिका महावीर नगर
     
  • २४
    १८० सदनिका महावीर नगर
     
ईकसर काँलनी
  • २५
    ८० सदनिका ईकसर काँलनी
     
साने गुरूजी नगर
  • २६
    ४०० सदनिका साने गुरूजी नगर
     
शास्त्री नगर
  • २७
    ५१२/७३६ सदनिका शास्त्री नगर
     
  • २८
    २२४/७३६ सदनिका शास्त्री नगर
     
  • २९
    २६०/३२० सदनिका शास्त्री नगर ईमारत क्र. १,३,४,५,६,७, ८,९,१०,१२
     
  • ३०
    २०/३२० सदनिका शास्त्री नगर ईमारत क्र.२
     
  • ३१
    ४०/३२० सदनिका शास्त्री नगर ईमारत क्र. ११
     
जूने गोराई रोड बोरीवली
  • ३२
    १०४०/२१६० जूने गोराई रोड बोरीवली
     
  • ३३
    १६०/२१६० जूने गोराई रोड बोरीवली
     
  • ३४
    ८०/२१६० जूने गोराई रोड बोरीवली
     
  • ३५
    १६०/२१६० जूने गोराई रोड बोरीवली
     
  • ३६
    ७२०/२१६० जूने गोराई रोड बोरीवली
     
  • ३७
    ८०/१०४ सदनिका नवीन गोराई रोड बोरीवली
     
  • ३८
    १२० सदनिका नवीन गोराई रोड बोरीवली
     
  • ३९
    ६० सदनिका नवीन गोराई रोड बोरीवली ईमारत क्र. ७ ते ९ उच्च
     
  • ४०
    ४० सदनिका उच्च गोराई रोड बोरीवली ईमारत क्र १०, ११
     
  • ४१
    १६ सदनिका गोराई रोड,८ दुकाने गोराई रोड
     
  • ४२
    ७२८ सदनिका / १०५६ नवीन गोराई रोड
     
  • ४३
    ३२८ सदनिका/ १०५६ नवीन गोराई रोड
     
  • ४४
    २४/१०४ सदनिका मध्यम नवीन गोराई रोड
     
उन्नत नगर - गोरेगाव
  • ४५
    ९६ सदनिका उन्नत नगर I
     
  • ४६
    ७८/५१४ सदनिका उन्नत नगर II
     
  • ४७
    २०० सदनिका उन्नत नगर III
     
  • ४८
    २८४/३४८ सदनिका उन्नत नगर IV
     
  • ४९
    ९ दुकाने उन्नत नगर IV
     
  • ५०ए
    १५ सदनिका उन्नत नगर Patrakar
     
मिठा नगर
  • ५०
    २१६/३४८ सदनिका मिठा नगर
     
  • ५१
    १३२/३४८ सदनिका मिठा नगर
     
राजेंद्र नगर
  • ५२
    २२२/२३४ सदनिका राजेंद्र नगर I.W.
     
  • ५३
    ६८/१४१ सदनिका राजेंद्र नगर अल्प/सी
     
  • ५४
    १७६ सदनिका राजेंद्र नगर अल्प/HPS
     
  • ५५
    ६४ सदनिका राजेंद्र नगर
     
  • ५६
    १४० सदनिका राजेंद्र नगर
     
डी. जी. नगर
  • ५७
    २४८/२५०० सदनिका डी. जी. नगर
     
  • ५८
    २२५२/२५०० सदनिका डी. जी. नगर
     
वनराई, गोरेगाव
  • ५९
    ६४०/७२० सदनिका वनराई, गोरेगाव
     
  • ६०
    ३४४/३७८ सदनिका वनराई, गोरेगाव
     
मिळकत व्यवस्थापक -V
  • अभ्युदय नगर, काळाचौकी
     
  • सरदार नगर, सायन
     
  • स्वदेशी मिल / चुनाभट्टी, सायन
     
  • जानेश्वर नगर, शिवडी
     
  • बाँम्बे डांईग
     
  • गांधी नगर, प्रभादेवी
     
  • खेर नगर, बांन्द्रा (पूर्व)
     
  • आदर्श नगर, वरळी
     
  • शिवाजी नगर, वरळी
     
  • १०
    अंबेडकर नगर, वरळी
     
  • ११
    लोकमान्य नगर, दादर
     
  • १२
    भारत नगर, बांन्द्रा (पू)
     
  • १३
    बांन्द्रा रिक्लेमेशन, बांन्द्रा(प)
     
  • १४
    फोरगेट मंझिल,ताडदेव
     
  • १५
    साकेत, वरळी
     
  • १६
    मछीमार, माहिम
     
  • १७
    गरमखाडा, लालबाग
     
  • १८
    नवयोजना, ताडदेव
     
  • १९
    वैशाली नगर, महालक्ष्मी
     
  • २०
    निलगंगा नगर, लोअर परेल
     
  • २१
    देवरत्ना नगर, चुनाभट्टी
     
  • २२
    प्रतिक्षा नगर , सायन
     
  • २३
    अन्टाँप हिल- वडाळा शिवडी
     

म्हाडाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील संबंधीत जिल्हयाप्रमाणे क्षेत्रीय मंडळे खालीलप्रमाणे:

  • अ. क्र.
    मंडळे व त्यांच्या कार्यालयाचे पत्ते
    जिल्हे
  • १.
    मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पु), मुंबई - ४०० ०५१.
    मुंबई शहर, मुंबई उपनगर.
  • २.
    मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पु), मुंबई - ४०० ०५१.
    मुंबई शहर
  • ३.
    मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पु), मुंबई - ४०० ०५१
    मुंबई शहर, मुंबई उपनगर.
  • ४.
    कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पु), मुंबई - ४०० ०५१.
    ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • ५.
    नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक- ४२२००२.
    नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार
  • ६.
    पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ,
    गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, पुणे- ४११००१.
    पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापुर
  • ७.
    औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ
    गृहनिर्माण भवन, "महावीर स्तंभ" जवळ,
    औरंगाबाद - ४४०००१.
    औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातुर, हिंगोली
  • ८.
    अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ, गृहनिर्माण भवन, टोपे नगर,
    अमरावती.
    बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम
  • ९.
    नागपुर गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ, सिव्हिल लाईंन्स,
    नागपुर - ४४०००१.
    वर्धा, नागपुर, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अभिहस्तांतरण दिल्याबाबतची माहिती

गृहबांधणीसाठी जमीन अधिग्रहीत करणे व सदनिका तसेच जमिनीची विल्हेवाटबाबतच्या म्हाडा अधिनियम १९७६ मधील तरतूदी.

म्हाडाने राबविलेल्या योजनेतील सदनिका व भूखंडांची विक्री महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (जमिनीचे वाटप) नियम १९८१ तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास ( मिळकत व्यवस्थापन गाळ्याची विक्री, हस्तांतरण व अदला बदल ) विनियम १९८१ तसेच नियम ( जमिनीचे वाटप ) १९८२ मधील तरतूदीनुसार केली जाते.
सदर नियम हे शासनाने तयार केले असून त्यामध्ये अटींची व्याख्या दर्शविली असून त्यानुसार नियम व विनियम स्विकृत केले आहेत नियम व विनियमामध्ये सदनिका व भूखंडांच्या विक्रीची पध्दत दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार जमिन व भूखंडाची विक्री वर्तमान पत्रामध्ये जाहीर नोटीस देऊन तसेच विनियम १६ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शनानुसार होते.
म्हाडाच्या प्रत्येक योजनेतील सदनिका / भूखंडापैकी ( जमिनीचे वाटप) १९८१ नियम १३ मधील तरतूदीनुसार ४७% हे विविध प्रवर्गासाठी राखिव असतात आणि २% हे विनियम १६ नुसार शासन स्वेच्छानिर्णय अंतर्गत राखिव ठेवण्यात येतात.

प्रवर्गनिहाय आरक्षण

  • अ. क्र.
    गट
    टक्के
  • १.

    अनुसूचित जाती आणि नवबौध्द(११%), अनुसूचित जमाती (६%), भटक्या जमाती (१.५%) व विमुक्त जमाती (१.५%)
    २०
  • २.

    पत्रकार
    २.५
  • ३.

    स्वातंत्र्य सैनिक
    २.५
  • ४.

    अंध व शारिरीक दृष्टया अपंग
  • ५.

    संरक्षण दलातील किंवा सीमा सुरक्षा दलातील जे कर्मचारी लढाईत मृत झाले असतील किंवा जखमी होऊन विकलांग झाले असतील किंवा बेपत्ता झाल्याचे घोषित झाले असतील, असे विकलांग कर्मचारी वा बेपत्ता वा मृत झालेल्या कर्मचार्‍यांचे कुटुंबीय.
  • ६.

    माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या व्यक्ती
  • ७.

    महाराष्ट्रातील मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेचे, विधानसभेचे व विधानपरिषदेचे आजी - माजी सदस्य
  • ८.

    म्हाडा कर्मचारी
  • ९.

    राज्य शासकीय व राज्य शासनाचा नियंत्रणाखालील महामंडळे इत्यादींचे कर्मचारी व अगोदर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
  • १०.

    शासकीय निवासस्थानामध्ये राहणारे आणि जे तीन वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत किंवा अगोदरच सेवानिवृत्त झाले असतील असे केंद्र सरकारचे कर्मचारी.
  • ११.

    चित्रपट, दूरदर्शन, नाटक, तमाशा, आकाशवाणी या माध्यमातील कलाकार
  • १२.

    शासन स्वेच्छा निर्णय
  • एकूण :
     
    ४९.००

उपरोक्त अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व जमाती या प्रवर्गातील सदनिका / भूखंडासाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त न झाल्यास सदर प्रवर्गातील आरक्षण शासनाच्या मान्यतेने सर्व साधरण जनता या प्रवर्गासाठी वर्ग करण्याची तरतूद आहे.
त्याचप्रमाणे म्हाडा अधिनियम १६ अंतर्गत वितरीत करावयाच्या जमिनी / भूखंडचे वाटप मुख्यत: बृहमुंबई, ठाणे, उल्हासनगर,पूणे, कोल्हापूर, सांगली-मिरज़ , सोलापूर , नाशिक व नागपूर या ठिकाणचे व्यावसायिक व सुविधा भुखंडाचे वाटप तसेच रहिवाशी जमिनी / भूखंडाचे वाटप २% पर्यतच करण्याचे अधिकार वाटप समितीला शासनाच्या दि. २२/११/२००५ च्या शासन निर्णयानुसार करण्याचे अधिकार आहे.

[view_3]